शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

लिप फास्टनर, शहर पोलीस संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:41 IST

प्रणव राजळे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर लिप फास्टनर संघाने व्हेरॉक करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत युनायटेड ब्रेवरीज संघावर ७ गडी राखून मात केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रणव राजळे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर लिप फास्टनर संघाने व्हेरॉक करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत युनायटेड ब्रेवरीज संघावर ७ गडी राखून मात केली. दुसºया लढतीत शहर पोलिसने पीडब्ल्यूडी संघावर ४ गडी राखून मात केली. औरंगाबादचा शैलीदार फलंदाज पंकज फलके, संदीप गायकवाड, राहुल जोनवाल यांची अर्धशतकी खेळी हेदेखील आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.एडीसीएच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत दोन लाँगआॅफ आणि एक कव्हरला टोलेजंग षटकार ठोकणाºया पंकज फलकेच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर युनायटेड ब्रेवरीज संघाने २0 षटकांत ५ बाद १७७ धावा ठोकल्या. पंकज फलके याने अवघ्या ५७ चेंडूंतच ३ उत्तुंग षटकार आणि १0 सणसणीत चौकारांसह नाबाद ९0 धावांची खेळी केली. संदीप गायकवाडने ५0 चेंडूंत ८ चौकारांसह ६२ धावा केल्या. लिप फास्टनर संघाकडून प्रणव राजळे याने २४ धावांत २ गडी बाद केले. राजेंद्र मदन याने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात प्रणव राजळेच्या नेत्रदीपक अर्धशतकी खेळीच्या बळावर लिप फास्टनर संघाने विजयी लक्ष्य १८.२ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले. दोन लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्हचे २ टोलेजंग षटकार व एक पूलचा मारलेला सनसणीत षटकार ठोकणाºया प्रणव राजळे याने अवघ्या ३९ चेंडूंत ३ षटकार व ६ चौकारांसह ६१ धावांची निर्णायक खेळी केली. त्याला इंद्रजित उढाणने ४५ धावा काढून साथ दिली. राजेंद्र मदनने १८ व राहुल पाटीलने नाबाद १५ धावा केल्या. युनायटेड ब्रेव्हरीजकडून संदीप गायकवाडने २ गडी बाद केले.दुसºया सामन्यात औरंगाबाद शहर पोलिस संघाविरुद्ध पीडब्ल्यूडी संघाने २0 षटकांत ८ बाद ११0 धावा केल्या. त्यांच्याकडून मनोज घोडकेने २२, योगेश राठीने २१ धावा केल्या. शहर पोलिस संघाकडून मिलिंद भंडारीने १४ धावांत ३ व शेख असीफने १९ धावांत २ गडी बाद केले. इम्रान खान व राहुल जोनवाल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात शहर पोलिस संघाने विजयी लक्ष्य १४.५ षटकांत ६ गडी गमावून १११ धावा करीत पूर्ण केले. त्यांच्याकडून राहुल जोनवाल याने ३६ चेंडूंत २ षटकार व ७ चौकारांसह नाबाद ५७ धावांची निर्णायक खेळी केली. इम्रान खान १५ धावांवर नाबाद राहिला.