शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

लिंगायत समाजाचे मंगळवारी राज्यभर धरणे आंदोलन

By admin | Updated: July 11, 2014 01:04 IST

औरंगाबाद : लिंगायत समाजास अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा व ओबीसींचे आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी लिंगायत समाज संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येत आहे.

औरंगाबाद : लिंगायत समाजास अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा व ओबीसींचे आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी लिंगायत समाज संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येत असून १५ जुलै रोजी सकाळी १० वा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात येणार आहेत. ही माहिती आज येथे पत्रपरिषदेत देण्यात आली. अन्य मागण्या अशा : महात्मा बसवेश्वराची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा, जि. सोलापूर येथे स्मारक उभारण्यात यावे, लिंगायत समाजासाठी प्रत्येक गावात स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा, संरक्षक भिंत व सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, लातूर येथील विमानतळास जगद्ज्योती महात्मा बसवेश्वराचे नाव देण्यात यावे, माला जंगम, बेडा जंगम व जंगम यांना जातीचे प्रमाणपत्र मिळण्यातील टाळाटाळ त्वरित थांबविण्यात यावी, जंगम जातीच्या वैधता प्रमाणपत्रासाठी १९५० पूर्वीच्या पुराव्याची अट रद्द करण्यात यावी. विश्वनाथ संगशेट्टी, शिवा लुंगारे, चंपावती झुंजरकर, विश्वनाथ स्वामी, भरत लकडे, शिवा खांडखुळे, नगरसेवक वीरभद्र गादगे, ज्ञानेश्वरअप्पा खर्डे, चंद्रकांत जिबकाटे, आशिष लकडे, जगदीश कोठाळे, शिवलिंगप्पा वडाळे, सीताराम पारे, नारायणस्वामी काजळे, सुरेश वाळेकर, राजेश कोठळे, दीपक उरगुंडे, बसवराज जिभकाटे आदींची उपस्थिती होती.