औरंगाबाद: राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, फातेमा शेख यांच्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ग्रामीण भागात रुग्णसेवा देणाऱ्या डॉ. सीताराम जाधव यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सरस्वती कॉलनी मित्रमंडळ, शिक्षक भारती कन्नडच्यावतीने डॉ. श्रीमंत कोकाटे, प्रा. प्रतिभा अहिरे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य विजय भोसले अध्यक्षस्थानी होते. आमदार उदयसिंग राजपूत यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दसपुते, समता परिषदेचे डॉ. संजय गव्हाणे, डॉ. मिलिंद पाटील आदींची उपस्थिती होती.
संदीप खरे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रवीण दाभाडे, किशोर नागणे यांनी मानले. राजानंद सुरडकर, विनोद पवार, सुनील पवार, गणेश बोडखे, शिवराज पाटील आदींनी परिश्रम घेतले.
----
फोटो-
सरस्वती कॉलनी मित्रमंडळ, शिक्षक भारती कन्नडच्यावतीने ग्रामीण भागात रुग्णसेवा देणाऱ्या डॉ. सीताराम जाधव यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना डॉ. श्रीमंत कोकाटे, प्रा. प्रतिभा अहिरे, मिलिंद पाटील आदी.