अंबड : खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग असून, खेळामुळे व्यक्तिच्या जीवनात आनंद निर्माण होतो. खेळामुळे व्यक्तिला प्रेरणा मिळते, खिलाडूवृत्ती तयार होते. प्रत्येकाने खेळाचा आनंद जीवनात घ्यावा, असे प्रतिपादन आमदार राजेश टोपे यांनी केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अंबड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रॉसकंट्री स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा मंगल कटारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ. उदय डोंगरे, शारीरिक शिक्षण विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. शेख, प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड, प्राचार्य डॉ. भागवत कटारे, प्रा. दिनकर तौर, उपप्राचार्य डॉ. विश्वास कदम उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. भागवत कटारे यांनी केले. स्पर्धेच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. याप्रसंगी डॉ. उदय डोंगरे, डॉ. एस. एस. शेख यांची समयोचित भाषणे झाली.आ. टोपे म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात सुदृढ शरीर व मन ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. मुलींचा सहभाग देखील वाढण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डॉ. राम रौनेकर तर आभार उपप्राचार्य डॉ. विश्वास कदम यांनी मानले. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ. प्रशांत तौर, प्रा. बी. बी. डावकर, प्रा. डॉ. सुलभा मुरलीधर, प्रा. जानकी कुर्तडीकर, प्रा. डॉ. डी. यु. मोठे, प्रा. सी. पी. कोठावळे, प्रा. डॉ. एस. के. घुमरे, प्रा. डॉ. दत्ता घोगरे, प्रा. डॉ. विनोद जाधव, प्रा. ज्ञानेश्वर उबाळे, प्रा. डॉ. आर. जे. वैद्य, प्रा. डॉ. दिगंबर भुतेकर, प्रा. आर. एस. भालेकर, प्रा. अनिल इंगळे, प्रा. प्रकाश अकोलकर, अधीक्षक पांडुरंग गहिरे, नारायण देवकर, अशोक साळवे, प्रा. डॉ. एस. एस. चव्हाण, प्रा. एस. एस. काटकर, प्रा. डॉ. पाथरे, प्रा. एस. एन. शिनकर, प्रा. सचिन शिंगणे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
खेळामुळे जीवनात आनंद निर्माण होतो-टोपे
By admin | Updated: August 22, 2015 23:55 IST