शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

पन्नास टक्के उमेदवारांची पोलिस भरतीकडे पाठ

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

उस्मानाबाद : जिल्हा पोलिस दलातील १४० पोलिस शिपाई भरतीसाठी येथे झालेल्या भरती प्रक्रियेत एकूण ४ हजार ६८१ उमेदवारांनी अर्ज भरले होते.

उस्मानाबाद : जिल्हा पोलिस दलातील १४० पोलिस शिपाई भरतीसाठी येथे झालेल्या भरती प्रक्रियेत एकूण ४ हजार ६८१ उमेदवारांनी अर्ज भरले होते. मात्र, यातील जवळपास पन्नास टक्के उमेदवारांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. हजर असलेल्या २३२३ उमेदवारांची मैदानी चाचणी गेल्या सहा दिवसांत पार पडलीअसून, यातील पात्र ठरलेल्या १२४५ उमेदवारांची लेखी परीक्षा १८ जून रोजी घेण्यात येणार आहे.६ जूनपासून येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर या पोलिस भरती प्रक्रियेस प्रारंभ झाला होता. यासाठी विविध ठिकाणच्या ४ हजार ६८१ उमेदवारांनी अर्ज भरले होते. पोलिस प्रशासनाकडून दररोज ७५० याप्रमाणे उमेदारांना भरती प्रक्रियेसाठी बोलाविण्यात आले होते. भरती प्रक्रियेत पहिल्याच दिवशी २७९ जणांनी प्रक्रियेकडेच पाठ फिरविल्याचे तर १६५ उमेदवार अपात्र ठरले़ दुसऱ्या दिवशीच्या प्रक्रियेत १६२, तिसऱ्या दिवशी १५५, चौथ्या दिवशी २१३,तर पाचव्या दिवशी २४५ उमेदवारांनी या भरतीकडे पाठ फिरविली. बुधवारी पार पडलेल्या महिला उमेदवारांच्या भरती प्रक्रियेतही केवळ ३१९ महिलांनी उपस्थिती लावली होती. यातून १८६ महिला पात्र ठरल्या आहेत. या उमेदवारांची दररोज लांब उडी, उंच उडी, धावणे, पुलअप्स आदी शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. यात ज्या उमेदवारांना पन्नास पेक्षा अधिक गुण मिळाले, त्यातून शासकीय प्रचलित नियमानुसार १:१५ या प्रमाणात एकूण १ हजार २४५ पुरूष व महिला उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यांनी १८ रोजी सकाळी सात वाजता पोलिस मुख्यालयात ओळखपत्रासह हजर रहावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी) मुख्यालयाच्या मैदानावर परीक्षाविविध शारीरिक चाचण्यांमधून पात्र ठरलेल्या १२४५ उमेदवारांची लेखी परीक्षा बुधवारी सकाळी ७ वाजता पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना बँक कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवरून ज्या ठिकाणी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाली होती, त्या मैदानातून प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच लेखी परीक्षेसंदर्भातील बैठक व्यवस्थेच्या माहितीचा फलकही मुख्यालयाच्या दर्शनीय भागावर लावण्यात येणार आहे. उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी येताना सोबत केवळ परीक्षा पॅड आणावे. याशिवाय ज्या उमेदवारांकडे कॅलक्युलेटर, मोबाईल, पुस्तक, चिठ्ठी आदी साहित्य आढळून आल्यास त्यांना परीक्षेतून अपात्र ठरविण्यात येणार असल्याचेही पोलिस अधीक्षक पाटील यांनी कळविले आहे.चेस्ट क्रमांक नोटीस बोर्डावरया लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांचा चेस्ट क्रमांक व प्रवर्गनिहाय निकाल पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर नोटीस बोर्डावर लावण्यात आला असून, याशिवाय पोलिस वेबसाईटवरही प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या नमुन्याचा व सूचनांचा फलक उमेदवारांच्या माहितीसाठी पोलिस मुख्यालयाच्या दर्शनी भागावर लावून वेबसाईटवरही उपलब्ध केला जाणार आहे.