शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

बिबट्याच्या अफवेने रात्र जागून काढली

By admin | Updated: March 21, 2016 00:17 IST

लोहारा : तालुक्यातील देवबेट टेकडीच्या पायथाशी असलेल्या विलासपुर पांढरी, माळेगाव, वडगाव (गां) परिसरात शनिवारी रात्री बिबट्या आल्याची अफवा पसरल्याने ग्रामस्थांनी अक्षरश:

लोहारा : तालुक्यातील देवबेट टेकडीच्या पायथाशी असलेल्या विलासपुर पांढरी, माळेगाव, वडगाव (गां) परिसरात शनिवारी रात्री बिबट्या आल्याची अफवा पसरल्याने ग्रामस्थांनी अक्षरश: रात्र जागून काढली. रविवारी ही केवळ अफवा असल्याचे पुढे आल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान, अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईची मागणी आता ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.शनिवारी रात्री आठच्या सुमारास विलासपुर पांढरी येथे एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून दाखल झाली. या व्यक्तीने येथील विठ्ठल मंदिरात एकाशीनिमित्त भजन करणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेऊन उमरगा परिसरातील बिबट्या आता देवबेट टेकडी परिसरात आला असून, आपल्या विलासपूर पांढरीजवळील वनीकरणात तो शिरला आहे. त्याचा आम्ही शोध घेत आहोत. गावकऱ्यांनी सावध राहावे. बिबट्या दिसल्यास या मोबाइल नंबरवर फोन करा, असे सांगून त्याने गावकऱ्यांना एक मोबाईल नंबरही दिला. ही व्यक्ती जावळपास दोन तास गावातच होती. पाहता पाहता ही अफवा जवळच असलेल्या माळेगाव, वडगाव, जेवळी आदी गावातही पसरली. या गावात मंदिरात एकादशीनिमित्त स्पीकरवर भजनाचा कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे काही अतिउत्साही व्यक्तींनी या स्पीकरवरूनही बिबट्या आल्याची माहिती दिल्याने ग्रामस्थांमध्ये चांगलीच धबराट पसरली. अनेकांनी शेताकडे गेलेल्या लोकांना घरी बोलावून घेतले. युवकांनी रात्रभर गावात खडा पहाराही दिला. त्यामुळे शनिवारची रात्र ग्रामस्थांनी अक्षरश: जागून काढली. दरम्यान, रविवारी सकाळी बिबट्याची ही अफवा असून, मुद्दाम खोळसाडपणाने ती पसरवाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता ही खोटी माहिती पसरविणारया व्यक्तीचा छडा लावून योग्य कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे. (वार्ताहर)