शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

डिग्रस बंधाऱ्यातून ८दलघमी पाणी सोडणार

By admin | Updated: July 22, 2014 00:17 IST

पालम : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातील पाणी सोडण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी २१ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास डिग्रस बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली आहे.

पालम : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातील पाणी सोडण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी २१ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास डिग्रस बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली आहे. तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातील पाणी पळविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकारी सक्रिय झाले आहेत. डिग्रस बंधाऱ्यातील नांदेड जिल्ह्यासाठीचे आरक्षित पाणी सोडावे यासाठी हालचाली केल्या जात आहेत. पाणी सोडताना अनेकांचा होणारा विरोध फोडून काढण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. डिग्रस बंधाऱ्यात सध्या २१ दलघमी पाण्याचा साठा आहे. पाऊस न पडल्यास पालम, पूर्णा व गंगाखेड तालुक्याची तहान या पाण्यावर भागू शकते. परंतु या साठ्यापैकी ८ दलघमी पाणी सोडले जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. दोन महिन्यांपूर्वी पाणी सोडताना जि.प. सभापती गणेशराव रोकडे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांंनी विरोध केला होता. त्यामुळे डिग्रस बंधाऱ्यात पाणीसाठा राहिलेला आहे. दुष्काळाचे संकट तालुक्यावर घोंगावत असताना पाणी सोडण्यासाठी हालचाली सुरू झाल्याने जनतेमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पाणी नेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील पुढारी व अधिकारी एकवटले आहेत. परंतु परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना मात्र पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळालेला नाही. ही दुर्दैवी बाब आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींना देण्यात येते परंतु या लोकप्रतिनिधींचा आवाज मात्र थंडावला आहे. (प्रतिनिधी)२४ जुलै रोजी पाणी सोडणार?पाणी सोडण्यासाठी विरोध करणाऱ्या गोरगरीब जनतेला मात्र लाठ्याकाठ्या खाण्याची वेळ येत आहे. बंधाऱ्यातील पाणी सोडताना अनेकांचा विरोध मोडूून काढण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार, अशी चिन्हे दिसत आहेत. २४ जुलै रोजी पाणी सोडण्याची तारीख ठरविली जाण्याची शक्यता आहे. डिग्रस बंधाऱ्याला पोलिस अधीक्षक संदीप पाटील, नियती ठाकर, उपविभागीय पोलिस अधिकारी जटाळे आदींनी भेट देऊन पाहणी केली आहे.