शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कोयता मुक्तीसाठी ‘वृंदावना’त शिक्षणाचे धडे

By admin | Updated: July 11, 2017 00:12 IST

बीड : समाजाचे आपण काही देणे लागतो, ही भावना जेव्हा आपल्यात जागृत होते तेव्हा निश्चितच आपली पावले आपोआप सत्कार्याकडे वळली जातात.

सतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : समाजाचे आपण काही देणे लागतो, ही भावना जेव्हा आपल्यात जागृत होते तेव्हा निश्चितच आपली पावले आपोआप सत्कार्याकडे वळली जातात. जेव्हा ध्येय निश्चित असते, तेव्हा फलश्रुतीही हमखास प्राप्त होते मात्र त्यास अथक प्रयत्नाची जोड असावी लागते. पिंपळवाडीच्या निसर्गरम्य माथ्यावरील ‘वृंदावना’त बालगोपाळ हातातील कोयता सुटण्यासाठी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.बीड जिल्हा हा तसा दुष्काळी भाग. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख. पिढ्यान पिढ्या हातात कोयता घेऊन जीवनाशी संघर्ष. पर्यायाने पुढची पिढी कधी शिकलीच नाही. कोयता घेऊन फडावर जायचे तर लहान लहान मुलांना कुठे ठेवायचे हा प्रश्न. जवळपास अख्खा गाव घराला कुलूप लावून ऊसतोडीसाठी भटकंती करत बाहेर. मुलांनाही सोबत घेऊन जाण्याशिवाय पर्याय नसायचा त्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित. शिक्षण नसल्यामुळे पिढ्यान् पिढ्या कोयत्याने कधी हात सोडलाच नाही. हातातून कायमचा जर कोयता सोडायचा असेल तर या लहान मुलांना निवासासह शिक्षण उपलब्ध करून देण्याशिवाय पर्याय नाही, याच भावनेतून या पिंपळवाडीच्या डोंगरमाथ्यावर उपेक्षितांच्या मुलांसाठी ‘वृंदावन’ आधार ठरत आहे. गुरुकुल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पिंपळवाडीच्या माध्यमातून ‘वृंदावन’ या निवासी वसतिगृहात जवळपास पन्नासच्यावर लहान मुले शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. अगदी मोफत त्यांच्या निवास, भोजन आणि शिक्षणाची व्यवस्था होत आहे. मोफत व्यवस्था असल्यामुळे प्रवेशाचा ओघ वाढत आहे. आतापर्यंत आणखी जवळपास पन्नास जणांनी प्रवेश मिळावा म्हणून विनंती केली आहे. या वृंदावनात फक्त सध्या मुलांनाच प्रवेश आहे. वसतिगृहातील मुले पिंपळवाडीच्या खासगी आणि जि.प. शाळेत शालेय शिक्षणासाठी जातात.ऊसतोड कामगार, उपेक्षित, शेतमजूरांच्या मुलांना या वृंदावनात प्रवेश दिला जातो. वृंदावनचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खूप काही करण्याची इच्छा असताना आर्थिक बाजू लंगडी पडत आहे. सामाजिक भावनेतून पिंपळवाडीचे माजी सरपंच युवराज बहिरवाळ, सरपंच अर्जुन बहिरवाळ, उपसरपंच शेख कटूभाई, संभाजी पाटील, मधुकर पाटील, सोमीनाथ धुमाळ, लक्ष्मण टाक, संजय भंडाणे, विठ्ठल बहिरवाळ यांनी पुढाकार घेऊन ज्ञानदानाचा वसा हाती घेतला आहे. जि.प. शाळेचे मुख्याध्यापक ए.डी. भांगे, केंद्र प्रमुख बी.एन. तांदळे, मुख्याध्यापक डी.ए. पाखरे, पी.ए.चौधरी, राजाभाऊ साळवे हे त्यांना सहकार्य करीत आहेत.