शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पालेभाज्या, दूधपुरवठ्यावर परिणाम

By admin | Updated: June 3, 2017 00:47 IST

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी शहरात पालेभाज्या व फळभाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम जाणवला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी शहरात पालेभाज्या व फळभाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम जाणवला. विक्रेत्यांनी आपल्याकडील शिल्लक फळभाज्यांचीच दुप्पट भावात विक्री केली, तर नेहमीपेक्षा ६५ हजार लिटरने दूध संकलन घटले होते. मात्र, फळभाज्या व दूध सहज मिळत असल्याने जनजीवनावर परिणाम जाणवला नाही. मात्र, संप सुरूराहिला तर उद्या शनिवारी तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शुक्रवारी जाधववाडी येथील फळभाज्यांच्या अडत बाजाराला साप्ताहिक सुटी होती. यामुळे जिल्ह्यातून व परजिल्ह्यांतून दररोज येणारे ८० ते ९० टन फळ व पालेभाज्यांची आवक आज झाली नाही. परिणामी भाजीमंडईत श्रावण घेवडा २०० रुपये, दोडके १०० रुपये, भेंडी, कारले, ६० रुपये तर फुलकोबी, दोडके ५० रुपये किलो, टमाटे ४० रुपये प्रतिकिलो अशा दुप्पट भावात भाज्या विकण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे संप लक्षात घेऊन विक्रेत्यांनी मागील दोन दिवसांत फळभाज्यांचा साठा करून ठेवला आहे. या कृत्रिम तेजीचा फायदा शेतकऱ्यांना किती होतो हे माहीत नाही; पण व्यापारी मात्र संपाचा संपूर्ण फायदा उचलत उखळ पांढरे करून घेत आहेत. होलसेल व्यापाऱ्यांनी सांगितले की, शहरात आजघडीला २० ते २५ टन पाले-फळभाज्यांचा साठा आहे. मात्र, शनिवारी या भाज्या विक्री होतील. जाधववाडीत परजिल्ह्यांतून फळभाज्या आल्या नाही, तर तुटवडा जाणवायला लागेल व शिल्लक असलेल्या भाज्यांचे भाव विक्रेते आणखी वाढवतील. तसे काही शेतकऱ्यांनी आज पहाटे व दुपारी दुचाकीवर पालेभाज्या आणून त्या औरंगपुरा व अन्य भाजीमंडईत विकल्या. यामुळे काही विक्रेत्यांकडे ताज्या भाज्या दिसून आल्या; पण त्याचे प्रमाण कमी होते. शहरात दररोज पाकीट बंद सुमारे दीड लाख लिटर दुधाची विक्री होत असते. मात्र, जिल्ह्यातील दूध संकलन कमी झाले व परजिल्ह्यांतून होणारा दूध पुरवठा घटल्याने सुमारे ८५ हजार लिटर दूध विक्रीस उपलब्ध झाले. तसेच दुधवाल्या भय्यांनीही नेहमीप्रमाणे घरपोच दूध आणून दिले. ग्राहकांना दूध सहज मिळत असल्याने दुधाच्या टंचाईचा परिणाम जाणवला नाही. शहरात जिल्ह्यातूनच नव्हे, तर नगर, कोपरगाव, जळगाव आदी जिल्ह्यांतील विविध दूधडेअरींकडून दुधाचा पुरवठा होतो. गुरुवारपासूनच दुधडेअरीवरील दूध संकलनावर परिणाम जाणवू लागला होता. यामुळे गुरुवारी सकाळी नेहमीपेक्षा सुमारे ३० हजार लिटर दूध कमी आले. आज संपाच्या दुसऱ्या दिवशी हाच आकडा ६५ हजार लिटरपर्यंत जाऊन पोहोचला. शहरातील देवगिरी महानंदाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पाटील यांनी सांगितले की, आमचे जिल्ह्यात पाच ठिकाणी दूध संकलन केंद्र आहे. दररोज सकाळी सध्या ५६ हजार लिटर, तर सायंकाळी ३५ हजार लिटर दूध संकलन होत असते. संपाच्या पहिल्या दिवशी आमच्याकडील दुधाचे संकलन १६ हजार लिटरने घटले होते. आज आणखी संकलन कमी होऊन सकाळी २१ हजार लिटरने दूध संकलन कमी झाले, अशीच परिस्थिती राहिली तर रविवारपर्यंत निश्चित दूध पुरवठ्यावर मोठा परिणाम जाणवेल, असेही त्यांनी नमूद केले. परजिल्ह्यातून येणाऱ्या ५० ते ७५ हजार लिटर दुधापैकी आज निम्मेच दूध विक्रीला आले होते.