शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी- एमआयएम एकत्र येण्याच्या हालचाली

By admin | Updated: December 31, 2016 22:09 IST

ब्ाीड : येथील पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपद खेचण्यात यशस्वी झालेल्या राष्ट्रवादीला प्रबळ विरोध करण्यासाठी काकू-नाना विकास आघाडी व एमआयएम एकत्रित येण्याचे संकेत आहेत.

ब्ाीड : येथील पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपद खेचण्यात यशस्वी झालेल्या राष्ट्रवादीला प्रबळ विरोध करण्यासाठी काकू-नाना विकास आघाडी व एमआयएम एकत्रित येण्याचे संकेत आहेत. उपनगराध्यक्षपदापासून राकाँला दूर ठेवण्यासाठी आघाडीे व एमआयएम यांच्यात हातमिळवणी होण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.थेट जनेतून नगराध्यक्ष होण्याचा मान पुन्हा एकदा डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना मिळाला आहे. मात्र, उपनगराध्यक्षपदासाठी त्यांची कोंडी करण्याची संधी जि. प. सभापती संदीप क्षीरसागर हे गमावू इच्छित नाहीत. पालिकेत सध्या सर्वाधिक २० नगरसेवक आघाडीकडे आहेत. मात्र, उपनगराध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठी त्यांना आणखी काही नगरसेवकांची मदत आवश्यक आहे. ९ नगरसेवकांसह दुसऱ्या क्रमाकांवर असलेल्या एमआयएमची मदत घेऊन उपनगराध्यक्ष पदासाठी मोट बांधण्याच्या अनुषंगाने संदीप क्षीरसागर यांनी रणनीती आखली आहे. प्रभावी विरोधक देण्यासाठी विरोधी बाकावर बसू पाहणाऱ्या एमआयएमने आपली शक्ती आता आघाडीसोबत लावण्याची तयारी दर्शवली आहे. प्राथमिक चर्चेमध्ये एमआयएमने तसे संकेत दिले आहेत.दरम्यान, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांनी १० जानेवारी रोजी पालिकेत दुपारी १२.१५ वाजता पहिली सर्वसाधारण सभा बोलावली आहे. यावेळी उपनगराध्यक्ष पदाची निवड केली जाणार आहे. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेमध्ये उपनगराध्यक्ष पदाकरिता नामनिर्देशनपत्र भरावयाचे आहे. नगरपालिका नियम २०१० चे नियम ३ अन्वये पालिका सदस्यांच्या एकूण संख्येच्या १० टक्के किंवा ५ यापैकी कमी असतील एवढे सदस्य नामनिर्देशित होऊ शकतात. त्यानुषंगाने एमआयएमकडे असलेल्या ९ सदस्यांचा स्वतंत्र गट पालिकेत विरोधी बाकावर बसणार आहे. मात्र, उपनगराध्यक्षपदासाठी त्यांची आघाडीला मदत मिळू शकते. तसे झाले तर आघाडी ठरवील तो सदस्य उपनगराध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारील. (प्रतिनिधी)