शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धूमधडाक्यात लक्ष्मीपूजन

By admin | Updated: October 31, 2016 00:47 IST

औरंगाबाद : सांजवेळ... दारासमोर रेखाटलेली सुंदर, कल्पक रांगोळी...पणतीचा मंद प्रकाश... आकाशकंदिल आणि विद्युत रोषणाईने निर्माण झालेला लखलखाट..

औरंगाबाद : सांजवेळ... दारासमोर रेखाटलेली सुंदर, कल्पक रांगोळी...पणतीचा मंद प्रकाश... आकाशकंदिल आणि विद्युत रोषणाईने निर्माण झालेला लखलखाट... घरभर दरवळणारा अगरबत्ती, धूपचा सुगंध... मुहूर्तावर सुरूझालेले मंत्रोच्चार, शास्त्रोक्त पद्धतीने केलेली लक्ष्मीची पूजा, आराधना... आणि नंतर फटाक्यांची आतषबाजी करून धूमधडाक्यात शहरवासीयांनी रविवारी दिवाळी साजरी केली. दिवाळीचा सण पाच दिवसांचा असला तरीही त्यात ‘लक्ष्मीकुबेर पूजन’ दिवस सर्वात महत्त्वाचा मानला गेला आहे. म्हणून तर रविवारी सायंकाळी शहरात चोहीकडे मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी ६.०१ ते ७.३६ (शुभ), रात्री ७.३६ ते ९.१० (अमृत) या मुहूर्तावर लक्ष्मीकुबेर पूजन करण्याचा मुहूर्त होता. त्यानुसार शहरवासीयांनी तयारी सुरूकेली होती. पूजेचा परिसर फुलांनी सजविण्यात आला होता... त्यावर लक्ष्मी, सरस्वती, श्रीगणेशाची प्रतिमा, पोस्टर ठेवण्यात आले होते. आजूबाजूला लाल रंगातील खतावणी, वह्या, कोऱ्या नोटा, नाणी मांडण्यात आली होती. रंगीत बोळक्यांमध्ये साळीच्या लाह्या, बत्ताशे ठेवण्यात आले होते. तसेच विविध फळांची आरास करण्यात आली होती. ‘घरातील पीडा बाहेर जावो आणि बाहेरची लक्ष्मी घरात येवो’ अशी प्रार्थना करीत घरोघरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करण्यात आले. पूजेसाठी पारंपरिक कपडे परिधान केले होते. सर्वत्र ‘आनंदी आनंद गडे’ असेच वातावरण होते. पूजा आणि त्यानंतर आरती झाली... सर्वांनी लक्ष्मीचे दर्शन घेतले आई-वडिलांच्या पाया पडण्यात आले आणि सुरूझाली फटाक्यांची आतषबाजी... शहरवासीयांनी धूमधडाक्यात दिवाळी साजरी केली.