शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मनपासाठी लातूरच्या ईव्हीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:16 IST

महापालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेसाठी जवळपास २ हजारांहून अधिक ईलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन (ईव्हीएम) लागणार आहेत. या मशीन लातूर आणि परभणीहून मागविण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेसाठी जवळपास २ हजारांहून अधिक ईलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन (ईव्हीएम) लागणार आहेत. या मशीन लातूर आणि परभणीहून मागविण्यात आल्या आहेत.महापालिका निवडणूक प्रक्रियेत २० प्रभागांमध्ये ८१ वॉर्डासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शनिवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. राजकीय रणधुमाळीसह प्रशासकीय तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणुकीमध्ये महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या प्रक्रियेसाठी २ हजार इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन लागणार आहेत. या मशीन नुकत्याच महापालिका निवडणुका झालेल्या लातूरमधून मागविण्यात येणार आहेत. त्यासह परभणी येथूनही ईव्हीएम मशीन घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत निर्देश दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने २ हजार ईव्हीएम मशीन लातूर आणि परभणीतून प्राप्त केले आहेत. या ईव्हीएम मशीनची एफएलसी अर्थात फर्स्ट लेवल क्लिअरिंगची प्रक्रिया सुरू आहे.यापूर्वी नांदेड जिल्हा प्रशासनाकडे ईव्हीएम मशीन होत्या. त्या आयोगाने परत मागवल्यानंतर पाठवण्यात आल्या आहेत. महापालिकेला ८०० कंट्रोल युनिट आणि २५०० बॅलेट युनिट प्राप्त झाले आहेत. एका मतदान केंद्रावर ४ बॅलेट युनिट आणि एक कंट्रोल युनिट लागणार आहे. मनपा निवडणुकीसाठी शहरात ५३६ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.दुसरीकडे व्हीव्हीपॅट मशिनच्या वापरासंदर्भातील अंतिम निर्णय अद्याप झाला नाही. व्हीव्हीपॅटद्वारे मतदाराला मतदान केंद्रात आपण कोणाला मतदान केले हे व्हीव्हीपॅट मशीनवर समजणार होते.मतदानाची स्लीप ही मतदान केंद्रातच एका वेगळ्या बॉक्समध्ये राहणार होती. या मशीनच्या वापरासंदर्भात शहरवासियांमध्ये उत्सुकता होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त एस. व्ही. सहारिया यांनी नांदेड महापालिकेत व्हीव्हीपॅटच्या वापरासंदर्भातील संदिग्धता कायम असल्याचे सांगितले. खुद्द राज्य निवडणूक आयुक्तांनीच मशीन वापराबाबत अनिश्चितता असल्याचे सांगितल्यामुळे आता या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.