शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

लातूरची एस.टी. सुसाट !

By admin | Updated: June 12, 2014 01:38 IST

बाळासाहेब जाधव , लातूर ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याने सेवा देणाऱ्या एस.टी. महामंडळाने एप्रिल-मे या दोन महिन्यांत लांब पल्ल्याच्या बसेस वाढवून ३१ कोटी १३ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.

बाळासाहेब जाधव , लातूर‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याने सेवा देणाऱ्या एस.टी. महामंडळाने एप्रिल-मे या दोन महिन्यांत लांब पल्ल्याच्या बसेस वाढवून ३१ कोटी १३ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंंडळाच्या वतीने प्रत्येक आगाराला एप्रिल-मे महिन्यामध्ये उत्पन्नाचे उद्दिष्ट दिले जाते. त्या उद्दिष्टाच्या आधारे गतवर्षी लातूर विभागामार्फत येणाऱ्या लातूर आगारातून ८ कोटी ५१ लाख, उदगीर आगारातून ६ कोटी ७३ लाख, अहमदपूर आगारातून ४ कोटी ६० लाख, निलंगा आगारातून ४ कोटी ९४ लाख, औसा आगारातून ४ कोटी १० लाख असे एकूण २८ कोटी ९३ लाख रुपये उत्पन्न गतवर्षी एप्रिल-मे या दोन महिन्यांत मिळाले. तर यावर्षी लातूर विभागाअंतर्गत येणाऱ्या लातूर आगारातून ८ कोटी ९९ लाख, उदगीर ७ कोटी २४ लाख, अहमदपूर ४ कोटी ९४ लाख, निलंगा ५ कोटी ५० लाख, औसा ४ कोटी ४४ लाख असे एकूण एप्रिल-मे या दोन महिन्यांतील ३१ कोटी १३ लाख रुपये उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या प्रमाणात यावर्षी उन्हाळ्यातील प्रवासी वाहतुकीसाठी जास्तीचे कर्मचारी नेमून त्यांच्या वेळोवेळी मिटींग घेऊन, त्यांना प्रबोधन करून व लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये वाढ केल्याने लातूर विभागाचे उत्पन्न गतवर्षीच्या प्रमाणात दोन कोटीने उत्पन्न वाढल्याची माहिती विभाग नियंत्रक डी.बी. माने यांनी दिली. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून वाढलेल्या उत्पन्नामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. स्थानिक बसेसअभावी प्रवाशांची गैरसोयमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागीय कार्यालयाच्या वतीने उद्दिष्ट वाढीच्या स्पर्धेसाठी लांब पल्ल्याच्या बसेस वाढविल्या. परंतु, त्यासाठी ग्रामीण भागातील काही गाड्या बंद केल्या. परिणामी, लगीनसराईच्या कालावधीत एप्रिल-मे महिन्यामध्ये नागरिकांची गैरसोय निर्माण झाली होती. परंतु, पुढील कालावधीत प्रवाशांची अशी गैरसोय होऊ दिली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.लांब पल्ल्याच्या बसेसचा करिश्मा...महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ लातूर विभागाने यंदा उत्पन्न वाढविण्यासाठी लांब पल्ल्याच्या ३२ गाड्या प्रवाशांच्या दिमतीला सोडल्या आहेत. त्यामुळे लातूर आगारासह जिल्ह्यातील सर्वच आगारांना फायदा झाला असून, महामंडळाच्या तिजोरीत २ कोटींची भर पडली आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यांत लांब पल्ल्याच्या बसेसने महामंडळाला ३१ कोटी १३ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.