लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : मुंबई-लातूर एक्स्प्रेसवरून सुरू झालेला संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. मंगळवारी होत असलेल्या रेल रोको आंदोलनाच्या पूर्वसंध्येला लातुरात बीदरचे खा. भगवंत खुब्बा यांनी पत्रपरिषद घेतली. खुब्बा यांना कृती समिती व संतप्त कार्यकर्त्यांनी घेराव घालत खा. खुब्बा, खा. सुनील गायकवाड यांच्या निषेधाच्या घोषणा देत शासकीय विश्रामगृहाचा परिसर दणाणून सोडला. तर तिकडे दिल्लीत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेतल्याने सोमवारचा दिवस गदारोळाचा ठरला.मंगळवारी होत असलेल्या रेल रोको आंदोलनासाठी प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
लातूर एक्स्प्रेस वाद शिगेला !
By admin | Updated: May 8, 2017 23:34 IST