शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्याकरिता उरला शेवटचा आठवडा

By admin | Updated: July 24, 2015 00:47 IST

बीड : खरीप हंगामात जिल्ह्यात पाच लाख ५९ हजार ५२९ हेक्टरवर पेरा झाला आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने सबंध पिके धोक्यात आहेत.

बीड : खरीप हंगामात जिल्ह्यात पाच लाख ५९ हजार ५२९ हेक्टरवर पेरा झाला आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने सबंध पिके धोक्यात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविम्याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी उपसंचालक बी. एम. गायकवाड यांनी केले आहे. ३१ जुलै ही अंतिम तारीख असल्याने शेतकऱ्यांच्या हाती केवळ एक आठवड्याचा कालावधी राहिलेला आहे.अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी पीकविमा हप्ता रकमेत १० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच गतवर्षी सोयाबीन पीकविम्यापासून वंचित राहिलेले बीड, माजलगाव, गेवराई या तालुक्यांचा यंदा नव्याने सहभाग करण्यात आला आहे. पीक लागवडीप्रमाणे विम्याची अंतिम मुदत ठरविण्यात आली आहे. खरीप ज्वारी, बाजरी, तूर, उडीद, मूग, कारळे, भूईमुग, सोयाबीन, कापूस या पिकांचा विमा सादर करण्याची तारीख लागवडीपासून एक महिना किंवा ३१ जुलै राहणार आहे. तब्बल दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने पिके धोक्यात आहेत. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. गतवर्षी जिल्ह्याला ३३६ कोटी रूपयांचा विमा मिळाला होता. पिकांमधून नाही तर किमान विमा रकमेतून आर्थिक उत्पन्न मिळण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणात विमा उतरविण्यात येत आहे.शेतकऱ्यांनी वाढविला रेटपीकविम्याच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी हेक्टरी साडेचार हजार हेक्टरीप्रमाणे पीकविमा काढला जात होता. यंदाच्या वर्षीपासून हेक्टरी सहा हजार प्रमाणे वीमा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही विम्याच्या रकमेत वाढ केली आहे. (प्रतिनिधी)येथील कृषी विभागाच्या वतीने गुरूवारी पीकविमा दिन साजरा करण्यात आला. दरम्यान, शेतकऱ्यांना पीकविम्याचे अर्जवाटप तसेच महत्त्व पटवून सांगण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी सहायक उपस्थित होते. गावपातळीवर शेतकऱ्यांना पीकविमा काढण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना विमा काढण्यात अडचण होऊ नये यासाठी कृषी विभागाचे अधिकारी राष्ट्रीयीकृत बँकेत उपस्थित असल्याचेही तंत्र विभाग अधिकारी बनसावडे यांनी सांगितले.