शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वस्तीशाळा शिक्षकांना अंतिम नोटीस

By admin | Updated: July 20, 2015 00:54 IST

बीड : नियुक्त्यात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवून वस्तीशाळा शिक्षकांना सोमवारी अंतिम नोटिसा बजावण्यात येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने

बीड : नियुक्त्यात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवून वस्तीशाळा शिक्षकांना सोमवारी अंतिम नोटिसा बजावण्यात येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १३ जुलै रोजी दिलेल्या आदेशानुसार सीईओ नामदेव ननावरे यांनी कारवाईच्या हालचालींना वेग दिला आहे.जिल्ह्यातील ७९३ वस्तीशाळा शिक्षकांच्या नियुक्त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ९०० वर शिक्षकांमुळे वस्तीशाळा शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्या नियुक्त्यांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने वस्तीशाळा शिक्षकांचा हिरमोड झाला आहे.२३ एप्रिल २०१५ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे कक्षाधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी वस्तीशाळा शिक्षकांचे नियुक्ती आदेश रद्द करावा असे आदेश काढले. त्याला शिक्षकांनी आक्षेप नोंदवित उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात देखील वस्तीशाळा शिक्षकांची निराशा झाली. दरम्यान, खंडपीठाच्या आदेशानुसार वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या वतीने अंतिम नोटिसा देण्यात येणार आहेत. यामध्ये नियुक्ती कधी झाली होती ? सेवा किती दिवस बजावली ? मानधन किती मिळाले ? कोठे नियुक्ती झाली होती ? आदी माहिती जाणून घेतली जाणार आहे. सात दिवसात म्हणणे मांडावयाचे आहे. वस्तीशाळा शिक्षक नोटिसांना काय उत्तरे देतात व या संदर्भातील अंतिम निर्णय काय होतो ? याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.अंतिम नोटिसा बजावण्याच्या हालचालीने वस्तीशाळा शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. एका शिक्षकाने आत्महत्या केलेली असल्याने हा प्रश्न आधीच गंभीर बनलेला आहे. (प्रतिनिधी)