शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

देवळाईत म्हाडाला जमीन

By admin | Updated: September 12, 2014 00:30 IST

औरंगाबाद : देवळाई परिसरात म्हाडाच्या गृहप्रकल्पासाठी शासनाने १८ हेक्टर गायरान जमीन देण्यास मंजुरी दिली होती.

औरंगाबाद : देवळाई परिसरात म्हाडाच्या गृहप्रकल्पासाठी शासनाने १८ हेक्टर गायरान जमीन देण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार म्हाडाने १८ पैकी १० हेक्टर जमिनीच्या मोबदल्याची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे जमा केली आहे. त्यामुळे ही जमीन लवकरच म्हाडाच्या ताब्यात दिली जाणार आहे. याठिकाणी लघु व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरांचा भव्य प्रकल्प उभारणार असल्याची माहिती म्हाडाच्या सूत्रांनी दिली. शहरालगत गृहप्रकल्प उभारण्यासाठी म्हाडाने मोठ्या प्रमाणावर नियोजन सुरू केले आहे. या प्रकल्पांसाठी शहरालगत विविध ठिकाणी गायरान जमीन मिळावी याकरिता म्हाडाने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केलेले आहेत. त्यापैकी देवळाई भागातील १८ हेक्टर गायरान जमिनीच्या प्रस्तावाला राज्य सरकारने फेबु्रवारी महिन्यात मंजुरी दिली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने २६ जून रोजी त्यासंदर्भातील आदेश जारी केला. शासनाने देवळाईच्या गट क्रमांक १४५ मधील ८ हेक्टर व गट क्रमांक ७३ मधील १० हेक्टर जमीन देण्यास मान्यता दिलेली आहे. म्हाडाला लवकरच जमिनीचा ताबा दिला जाणार आहे. म्हाडाने १८ हेक्टर गायरान जमिनीपैकी १० हेक्टर ७९ आर जमिनीचा मोबदला जिल्हा प्रशासनाकडे जमा केला आहे. गट क्रमांक ७३ मधील ६ हेक्टर ४ आर आणि गट क्रमांक १४५ मधील ४ हेक्टर ७५ आर जमिनीच्या मोबदल्यापोटी म्हाडाने १८ कोटी ५७ लाख रुपये इतकी रक्कम जमा केली आहे. उर्वरित ७ हेक्टर २१ आर जमिनीचे मूल्यांकन भरणे बाकी आहे. म्हाडाने मूल्यांकनाची रक्कम जमा करताच त्यांच्याकडे गायरान जमिनीचा ताबा दिला जाणार आहे.