शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागात लाखो रुपयांचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:22 IST

राज्याच्या कृषी विभागाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्याच्या कृषी विभागाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आत्मा संस्थेचे प्रकल्प संचालक आणि कृषी अधीक्षक यांच्या बनावट सह्या करून हा घोटाळा करण्यात आला. ६६ लाख १९ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी वरिष्ठ लिपिक तथा रोखापालास मंगळवारी रात्री एका रुग्णालयातून अटक केली. दरम्यान आरोपीला १४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घोटाळ्यात कृषी विभागातील व बँकेतील वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.सुनील गहेनाजी जाधव (सुरेवाडी) असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे. उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश टाक म्हणाले की, शासनाकडून शेतकºयांसाठी विविध योजना कृषी अधीक्षक कार्यालय आणि प्रकल्प संचालक आत्मा या दोन कार्यालयांमार्फत राबविण्यात येतात. शहानूरवाडी रोडवर ही दोन्ही कार्यालये आहेत. जून २०१२ ते जून २०१७ या कालावधीत आरोपी जाधव हा लेखापाल, लिपिकपदी कार्यरत होता. नोव्हेंबर २०१६ मध्ये आरोपीची बदली झाली. त्याच्या जागेवर रुजू झालेले वरिष्ठ लिपिक के.जी. पाटील यांनी वारंवार मागणी करूनही आरोपीने त्यांना दोन बँक अकाऊं टची माहिती, पासबुक, कॅशबुक, चेकबुक, व्हाऊचर फाइल दिली नाही. त्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी बँकेकडून दोन्ही खात्याच्या स्टेटमेंटची माहिती घेतली. बँकेकडून मिळालेल्या स्टेटमेंटमध्ये आरोपीने एका खात्यात बेकायदेशीर दहा लाख रुपये जमा केल्याचे आढळले. ही रक्कम कशाची आहे, याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण त्याने कार्यालय प्रमुखांकडे दिले नाही. त्यांनी ही बाब नव्याने रुजू झालेले प्रकल्प संचालक आणि कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांना कळविली. २००८-९ पासून ते कालपर्यंत झालेल्या खर्चाचे लेखा परीक्षण करण्यासाठी एक पथक पाठविले. पासबुकवरील नोंदी पाहून जाधवने दोन्ही वेगवेगळ्या खात्यात ६६ लाख १९ हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार रेणापूरकर यांनी मंगळवारी रात्री नोंदविली.