शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

टाकी ओव्हरफ्लो होऊन लाखो लिटर पाणी वाया

By admin | Updated: August 10, 2014 02:20 IST

उमरगा : शहराला पाणीपुरवठाक रणारी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊन लाखो लिटर पाणी वाया गेले. दरम्यान, पाऊस नसतानाही मध्यरात्रीच्या

उमरगा : शहराला पाणीपुरवठाक रणारी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊन लाखो लिटर पाणी वाया गेले. दरम्यान, पाऊस नसतानाही मध्यरात्रीच्या सुमारास अचानक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची अक्षरश: झोप उडाली. शहरातील कार्ले प्लॉट भागातील साई मंदिर परिसरात शुक्रवारी रात्री एक ते पहाटे साडेपाच या कालावधीत हा प्रकार घडला. याबाबत माहिती अशी की, शहरातील विविध प्रभागाला पाणीपुरवठा करण्यासाठी येथील अंतुबळी सांस्कृतिक सभागृह, मलंग प्लॉट, महात्मा बसवेश्वर विद्यालय, हमीद नगर या भागात जलकुंभ उभारण्यात आले आहेत. येथील अंतुबळी सांस्कृतिक सभागृहाजवळ उभारलेल्या जलकुंभामार्फत साईनगर मंदिर परिसरातील कार्ले प्लॉट, औटी प्लॉट या भागात पाणीपुरवठा केला जातो. या सर्वच जलकुंभांना माकणी धरणातील समुद्राळ येथील जलशुध्दीकरण केंद्रामार्फत थेट जलवाहिनी टाकण्यात आली आहे. हे जलकुंभ टप्प्याटप्प्याने भरले जातात. शुक्रवारी रात्री येथील अंतुबळी सांस्कृतिक सभागृहाशेजारील पाण्याची टाकी भरणे सुरू होते. रात्री एक वाजल्यानंतर टाकी पूर्ण भरून ती ओव्हरफ्लो झाली. यामुळे हे पाणी कालॅ प्लॉट भागात शिरले. पाऊस नसतानाही अचानक रस्त्यावरून पाणी वाहू लागले. याशिवाय या भागातील रहिवाशी महादेव माने, दयानंद बिराजदार, अप्सर डांगे यांच्या घरात पाणी घुसले. विठ्ठल कलमले यांच्या घरापुढे वाहून आलेल्या पाण्यामुळे तळे साचल्याचेही दिसून आले. रस्त्यावरून वाहत असलेले पाणी आपल्या घरात शिरू नये यासाठी प्रत्येकजण पाणी अडविण्याचा प्रयत्न करीत होते. तर काही गृहिणी घरात शिरलेले पाणी बाहेर काढत असल्याचे शनिवारी सकाळी दिसून आले. (वार्ताहर)