शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तीन तलाठ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड

By admin | Updated: July 14, 2016 01:36 IST

संजय देशपांडे, औरंगाबाद गंगापूर तालुक्यातील सव्वाकोटी रुपयांच्या दुष्काळी अनुदान घोटाळ्याप्रकरणी तीन तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

संजय देशपांडे, औरंगाबादगंगापूर तालुक्यातील सव्वाकोटी रुपयांच्या दुष्काळी अनुदान घोटाळ्याप्रकरणी तीन तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यांवर कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तलाठ्यांनी तयार केलेल्या बनावट लाभार्थ्यांच्या याद्यांवर सह्या करणाऱ्या तहसीलदारांवरही कारवाई होण्याची चिन्हे आहेत. शिरेसायगाव आणि गवळी शिवरा सजाचे तलाठी जे. के. सोनवणे, व्ही. व्ही. कंसार आणि ज्ञानेश्वर नजन यांच्यावर वैजापूरचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी निलंबनाची कारवाई केली, तर मंडळ अधिकारी के. के. जेठे, रिता पुरी आणि आर. डी. माने यांच्यावर कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्हा सहकारी बँकेने यापूर्वीच गंगापूरचे तालुका नियंत्रक व्ही. बी. जाधव, सिद्धनाथ वाडगावचे शाखाधिकारी एस. बी. खेडकर, रघुनाथनगरचे शाखाधिकारी आर. के. बारहाते, निरीक्षक बी. ई. कबाडी आणि अंबेलोहळ येथील लिपिक व्ही. बी. मोकळे यांना निलंबित केले होते. अशा प्रकारे जिल्हा बँक आणि तहसील कार्यालयातील निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या आता नऊ झाली आहे.दुष्काळाच्या संकटाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाच्या रूपाने मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. २०१४-१५ आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षातील अनुदानासाठी गंगापूर तालुक्यास कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. शेतकऱ्यांना हेक्टरी ६,८०० रुपये किंवा जास्तीत जास्त १३,६०० रुपये अनुदान मंजूर करण्यात आले. वसुली करणारगंगापूर तालुक्यात झालेल्या दुष्काळ अनुदान गैरव्यवहारप्रकरणी तीन तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मंडळ अधिकाऱ्यांवर कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. चुकीच्या याद्यांवर सह्या करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी केली जाईल तसेच अनुदान हडपणाऱ्या बनावट शेतकऱ्यांकडून वसुली केली जाणार आहे.- निधी पांडे, जिल्हाधिकारी