शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

कुलकर्णी, अवचटच्या घरझडतीत मिळाली महत्त्वाची कागदपत्रे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2016 00:19 IST

औरंगाबाद : अनिवासी भारतीयांचा फंड मिळवून देण्याच्या नावाखाली औरंगाबादेतील औषधी व्यावसायिकाला ३५ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या

औरंगाबाद : अनिवासी भारतीयांचा फंड मिळवून देण्याच्या नावाखाली औरंगाबादेतील औषधी व्यावसायिकाला ३५ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या निवेदिता कुलकर्णी आणि विश्वनाथ अवचट यांच्या पुणे येथील वेगवेगळ्या घरांची रविवारी पोलिसांनी झडती घेतली. या झडतीत पोलिसांच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे, डायऱ्या आणि चेकबुक लागले आहेत. विशेष म्हणजे सरकारी पंचांना सोबत घेऊन ही झडती घेण्यात आली.सिडकोतील अभिजित कुलकर्णी यांना अनिवासी भारतीयांचा फंड मिळवून देण्याच्या नावाखाली आरोपी निवेदिता कुलकर्णी, विश्वनाथ अवचट, बाळासाहेब दैठणकर, कमलाकर कुलकर्णी, सुरेश चव्हाण आणि अशोक जंगम (रा.मुंबई) यांनी तब्बल ३५ लाख रुपयांचा गंडा घातला. अशाच प्रकारे या टोळीने राज्यातील अनेकांना सुमारे दोन कोटी रुपयांना फसवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी निवेदिता आणि विश्वनाथ यांना मुंबईतून अटक करून आणले. दरम्यान, रविवारी आरोपींच्या पुणे येथील घराची झडती घेण्यासाठी फौजदार सुभाष खंडागळे, पोलीस कर्मचारी दादासाहेब झारगड, सुरवाडे, कुलकर्णी, महिला पोलीस जयश्री फुके आणि दोन सरकारी पंच गेले. या पथकाने अवचटच्या सिंहगड रोडवरील फ्लॅटची आणि लक्ष्मीनगर येथील भावाकडे राहणाऱ्या निवेदिता यांच्या घराची झडती घेतली. या झडतीमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे बनावट बॉण्ड पेपर, दोन डायऱ्या, दोन चेकबुक मिळाले. या डायऱ्यांमध्ये आरबीआयच्या बॉण्ड पेपरवर हाताने लिहिलेला मजकूर मिळाला. तसेच हिशेबाची एक डायरीही पोलिसांच्या हाती लागली.