शिवा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार यांनी सामाजिक हित जपत प्रशासन व महसूल विभागाकडे कुठलीही अट न ठेवता पूर्णपणे नि:शुल्क सेवा देण्याचे ठरवले. त्यानुसार मागील वर्षी ६ मार्च २०२० पासून यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक महाविद्यालयात व रुग्णालयात कोविड सेंटर सुरू केले. संस्थेने १६८४ स्थलांतरित मजुरांना आधार देऊन सामाजिक बांधिलकी जपली होती. मागील वर्षी ९३४ रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. सध्या येथे ४८ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ३७९ रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली. येथे रुग्णांना दोन वेळेस आयुष काढा दिला जातो. योगासने करून घेतले जातात. निसर्गरम्य वातावरण व शुद्ध हवेचा मोठा सकारात्मक परिणाम रुग्णावर होत आहे. रुग्णावर योग्य उपचार व्हावेत, यासाठी प्राचार्य डॉ. भैरव कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. पंकज गुहुंगे, डॉ. वैजनाथ यादव, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री पवार यांचासह अन्य अधिकारी, नर्स, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
( फोटो )