शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी खरीप कोमेजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:03 IST

पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांची स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांची स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. आठवडाभरात पाऊस न झाल्यास कपाशीसह सोयाबीन, तूर, मूग ही पिके पूर्णत: हातची जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी गुरुवारी विरेगाव व पाचन वडगाव मंडळातील गावांमध्ये जाऊन पीक परिस्थितीचा आढावा घेतला.तालुक्यातील विरेगाव व पाचन वडगाव या मंडळातील वडीवाडी, कारला, कोडी, माली पिंपळगाव, हिस्वन, खणेपुरी, हातवण, भाटेपुरी इ. गावांमध्ये सुरुवातीपासून कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील बहुतांश पिके सुकली आहेत. काही ठिकाणी शेतकºयांनी सुकलेल्या पिकांमध्ये जनावरे सोडली आहेत, तर काहींनी सोयाबीन पीक मोडले आहे. त्यामुळे या भागातील पिकांचा पंचनामा करण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी शेतात जाऊन स्थितीचा आढावा घेतला. परिसरातील शेतकºयांशी चर्चा केली. मागील अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने बरीच पिके वाया गेली आहेत.आठवडाभरात पाऊस न झाल्यास कपाशीही वाया जाण्याची शक्यता असून, या पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याचे शेतकºयांनी जोंधळे यांच्या निदर्शनास आणून दिले. परिसरातील किती शेतकºयांनी पीकविमा भरला, याबाबतची माहिती जिल्हाधिकाºयांनी जाणून घेतली. दोन्ही मंडळातील गावांना पिण्यासाठी पाणी व जनावरांसाठी चारा याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात येईल. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या.या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी दशरथ तांभाळे, तहसीलदार विपीन पाटील, नायब तहसीलदार संदीप ढाकणे, तालुका कृषी अधिकारी राम रोडगे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, गोविंद कुटे यांच्यासह शेतकºयांची उपस्थिती होती.