शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामात केवळ तुरीवरच शेतकऱ्यांची मदार

By admin | Updated: November 9, 2016 01:23 IST

बीड उशिरा झालेल्या पावसाचा केवळ तुरीला फायदा झाला असून, या पिकाच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

राजेश खराडे  बीडहंगामाच्या सुरवातीला अत्यल्प पाऊस, कीड, रोगराई व पिके अंतिम टप्प्यात असताना बसलेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात सोयाबीन, बाजरी या पिकांसह कडधान्याचे मोठे नुकसान झाले होते. उशिरा झालेल्या पावसाचा केवळ तुरीला फायदा झाला असून, या पिकाच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दरवर्षी खरिपातील सोयाबीन आणि कापूस या प्रमुख पिकांनीच शेतकऱ्यांना तारले आहे. यंदा मात्र निसर्गाच्या अवकृपेने खरीप हंगामाचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. रिमझिम पावसाच्या आधारावर काही प्रमाणात उडीद, मूग शेतकऱ्यांच्या पदरी पडले खरे; मात्र उत्पादनात मोठी घट झाली होती. सोयाबीन, बाजरीची तर मोडणी करून रबी हंगामाला क्षेत्र रिकामे करण्यात आले होते. बागायती क्षेत्राप्रमाणे तुरीला अतिवृष्टीचा फायदा झाला होता. त्यामुळे सध्या तूर बहरली असून फुलोऱ्यात आहे. असे असताना देखील शेंग पोखरणारी व शेंगमाशीचा प्रादुर्भाव तुरीवर जाणवू लागला आहे. या दोन्हीतून पिकांचा बचाव झाल्यास तुरीच्या उत्पादनात तिप्पट वाढ होणार असल्याचे कृषी अधिकारी रामेश्वर चांडक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. शिवाय लागवडीपूर्वी केलेलीे मशागत व संरक्षण उपाययोजना याचा फायदाही उत्पादनाच्या रूपातून शेतकऱ्यांना होणार आहे. सद्य:स्थितीला कापूस आणि तूर ही दोनच पिके वावरात असून, गुलाबी बोंडअळीचा धोका कापसाला वाढला आहे. यामध्ये कापसाचे बोंड दिसते खरे; मात्र या अळ्या बोंडातील कापूस उद्ध्वस्त करीत आहेत. त्यामुळे कापसाचे उत्पादन निम्म्यावर येत आहे. उर्वरित काळात शेतकऱ्यांनी विद्यापीठाने ठरवून दिलेल्या पद्धतीची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. याकरिता कृषी अधिकाऱ्यांचीही भूमिका महत्वाची आहे. दरम्यान, यंदा दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, परंतु प्रत्यक्षात खरिपात अपेक्षित उत्पादन पदरात पडले नाही.