शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

मुळ प्रतीत खाडाखोड; लाखोंचा अपहार !

By admin | Updated: May 31, 2016 00:09 IST

बाळासाहेब जाधव ल्ल लातूर एसटी महामंडळाच्या त्रैमासिक पास योजनेत अंतर कमी दाखवून घोटाळा केल्याचे उघड झाले आहे़ यातून लातूरच्या एसटी महामंडळाला २ लाखांचा

बाळासाहेब जाधव ल्ल लातूरएसटी महामंडळाच्या त्रैमासिक पास योजनेत अंतर कमी दाखवून घोटाळा केल्याचे उघड झाले आहे़ यातून लातूरच्या एसटी महामंडळाला २ लाखांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला असून यात आणखीन घोटाळा असल्याची शक्यता आहे़ त्या दृष्टीने प्रशासनाने चौकशी सुरु केली आहे़ ज्या कर्मचाऱ्याने हा घोटाळा केला त्या कर्मचाऱ्याचा टेबल आता बदलण्यात आला असून, त्याच्यावर वाहतूक नियंत्रकाची जबाबदारी सोपविली आहे़महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर आगारा अंतर्गत निलंगा व उदगीर या ठिकाणीही त्रैमासिक पासमध्ये अपहार झाला होता़ संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती़ या घटनेला एक वर्ष उलटत नाही़ तोपर्यंत लातूर आगारात त्रैमासिक पासेस योजनेतून अपहार झाल्याचे उघड झाले आहे़ २ लाखांचा फटका महामंडळाला बसला आहे़ गेल्या तीन वर्षात १ ते दीड हजार त्रैमासिक पासेस देण्यात आले आहेत़ विशेष म्हणजे दिलेला पास लातूर ते निलंगा परंतू कार्यालयीन दप्तरात लातूर ते चांडेश्वर असा एकाच टप्प्याचा प्रवास दाखविण्यात आला आहे़ असे हजारो पासेस दिले आहेत़ यातून संबंधित कर्मचाऱ्याने लाखोंचा मलिदा लाटल्याचा ठपका आहे़ विभागीय वाहतूक अधिकारी व लातूर आगार प्रमुख यांनी पासेस दप्तराची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे़ संबंधित कर्मचाऱ्यांकडून पासेसचे दप्तरही ताब्यात घेतले आहे़एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी शालेय विद्यार्थी पास, वार्षिक पास, त्रैमासिक पास या सवलतीच्या योजना सुरु केल्या आहेत़ आवडेल तेथे प्रवास ही योजनाही आहे़ २० दिवसाच्या पैशात ३० दिवस, ६० दिवसाच्या पैशात ९० दिवसांचा प्रवास तर २०० रुपयात वार्षिक प्रवास अशा या सवलतीच्या योजना आहेत़ त्यातील त्रैमासिक पास योजनेत २ लाखांचा घोटाळा झाल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी गौतम जगतकर, लातूर आगार प्रमुख धरणी कांडगीरे यांनी केलेल्या तपासणीत उघड झाले आहे़ वाहतूक नियंत्रक अजित बोयणे यांनी दिलेल्या पासमध्ये हा घोटाळा उघड झाल्याने अन्य २९ वाहतूक नियंत्रकांनी दिलेल्या पासची तपासणी केली जात असून, त्यासाठी पथक नियुक्त केले आहे़चौकशीनंतर कारवाई : विभागीय वाहतूक अधिकारी़़़याबाबत विभागीय वाहतूक अधिकारी गौतम जगतकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले़ त्रैमासिक पास काढण्यासाठी ३ प्रतीमध्ये पावती बनवावी लागते़ त्यामध्ये प्रवाशांना वेगळी ओसी दिली़ तर कार्यालयीन ओसीमध्येही बदल केल्याचे दिसून आले आहे़ प्रथमदर्शनी २ लाख रुपयांचा यात अपहार असावा़ आगार प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरु आहे़ चौकशीनंतर दोषीवर कारवाई केली जाईल असे ते म्हणाले़