शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक चळवळ कायम तेवत राहावी- कुलगुरू

By admin | Updated: June 28, 2017 00:28 IST

नांदेड : नांदेड एज्युकेशन सोसायटी ही ध्येयवादी संस्था असल्याचे प्रतिपादन स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड एज्युकेशन सोसायटी ही एक ध्येयवादी संस्था असून या संस्थेमध्ये मराठवाड्याच्या शैक्षणिक चळवळीचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर यांनी केले़ नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खा़ डॉ़ व्यंकटेश काब्दे तर सहसचिव अ‍ॅड़ चैतन्यबापू देशमुख, सदाशिवराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी अंजली कुलकर्णी हिने शारदास्तवन सादर केले़ शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था तसेच शिक्षकांनी वर्तमानकालीन आव्हानांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच समाजोपयोगी संशोधनावर भर दिला पाहिजे़ विद्यापीठाने सीबीसीएस पॅटर्न निर्माण करून नवीन आदर्श घडवून दिला आहे़ आज तो सर्व विद्यापीठांसाठी अनुकरणीय ठरला आहे़ पीपल्स व सायन्स कॉलेजने मराठवाड्यातील अन्य महाविद्यालयांना शैक्षणिक विकासाच्या वाटा दाखवाव्यात, असे कुलगुरू डॉ़ विद्यासागर म्हणाले़अध्यक्षीय समारोपात डॉ़ व्यंकटेश काब्दे म्हणाले, संस्थेचा ६७ वा वर्धापन दिन होत असून संस्था ज्येष्ठ झाली आहे़ त्यामुळे संस्थेच्या विकासासाठी शासन व विद्यापीठाकडे विविध योजनांद्वारे अनुदान मागता येईल़ परंतु, त्याबरोबरच संस्था श्रेष्ठ होण्यासाठी शिक्षक, कर्मचारी व संस्थाचालकांनी एकत्रितपणे कठोर परिश्रम करण्याची गरज आहे़ प्रास्ताविकात संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडला़ पीपल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ़ आऱ एम़ जाधव, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ़ डी़ यु़ गवई, पीपल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक अवधुत गिरी यांनी मनोगत व्यक्त केले़ सायन्स कॉलेजने नॅशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये देशात ७२ वा आणि महाराष्ट्रात सहावा तर मराठवाड्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल प्राचार्य डॉ़ डी़ यु़ गवई यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल राहुल गवारे, महेश डोंगरकर यांचाही सत्कार करण्यात आला़ सूत्रसंचालन डॉ़ अशोक सिद्धेवाड तर संस्थेचे सहसचिव अ‍ॅड़ चैतन्यबापू देशमुख यांनी आभार मानले़ माजी प्राचार्य देशपांडे, प्रा़ राजाराम वट्टमवार, इंजि़ द़ मा़ रेड्डी, सितारामजी जाजू यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते़