जालना : येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू असलेल्या कविसंमेलन, कथाकथन आणि साहित्यिक आपल्या भेटीला या विविध उपक्रमांनी आज दुसऱ्या दिवशी रसिकांना मंत्रमुग्ध केले. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानअंतर्गत ग्रंथोत्सव कार्यक्रम सुरू आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता कवी धोंडोपंत मानवतकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. प्रारंभी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कविसंमेलनात कैलास भाले, प्रदीप देशमुख, दिगंबर दाते, नारायण खरात, प्रभाकर शेळके, दीपक राखुंडे, अशोक डोरले, संतोष जोशी, बाबसाहेब गोन्टे, विद्या दिवटे, रेखा गतखणे- जाधव, विणा पाठक, इलियास मोईनोद्दीन, गणेश ढाकणे, मुकुंद दुसे, प्रकाश कुंडलकर, निशिकांत मिरकले, संतोष कातुरे, विजय जाधव यांनी आपल्या कविता सादर केल्या. कविसंमेलनात शालेय विद्यार्थ्यांमधून कोमल गवळी, संजीवनी गंगनीरे, योगिता घनवई, नंदा घनवई, पूनम आदमाने, कल्याणी साळवे, रमा बनसोडे, उषा सौदागर, रिना सूरडकर, राणी राठोड, कावेरी चव्हाण, मयुरी कारूतकर, सुनीता उबाळे, छाया पवार, रुपाली लिपणे आदींनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. प्रास्ताविक एम.आर. मुनमाने यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. सुहास सदाव्रते यांनी केले.दुपारच्या सत्रात प्रा. बसवराज कोरे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन झाले. यात कथाकार विजय जाधव यांनी बरड ही कथा सादर केली. स्त्री भू्रण हत्येवर प्रभाकर शेळके यांनी आक्रोश कथा सादर करून उपस्थितांना अंतर्मुख केले. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या साहित्यिक आपल्या भेटीला या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक किशोर घोरपडे यांची मधुकर गायकवाड यांनी मुलाखत घेतली. याच कार्यक्रमात प्रा. बसवराज कोरे यांची डॉ. प्रतिभा श्रीपत यांनी मुलाखत घेऊन त्यांचा साहित्यिक प्रवास उलगडून दाखविला. ग्रंथोत्सवात माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास शेवाळे, उपशिक्षणाधिकारी गजानन सूसर, समन्वयक प्रभाकर शिंदे, आर.आर. जोशी, जगत घुगे, सुनील मावकर, डॉ. विशाल तायडे आदी उपस्थित होते.
कविसंमेलन, कथाकथनाने ग्रंथोत्सवातील रसिक मंत्रमुग्ध
By admin | Updated: February 18, 2015 00:40 IST