कंधार : दरवर्षी आषाढ महिन्यात भाजीपाल्याचे भाव घसरतात, परंतु दीड महिना संपत आला तरीही पावसाचा मागमूस नाही़ मोठ्या लागवडीअभावी भाजीपाल्याचे भाव महिन्यात दुप्पट झाले आहेत़ हिरवी मिरची तिखट अन् कांदा डोळ्यात पाणी आणत असल्याचे चित्र आहे़मागील वर्षी विक्रमी पावसाची नोंद झाली़ नदी-नाले, तलावात मुबलक जलसाठा पावसाळ्यात होता़ उपलब्ध जलसाठ्याने खरीप हंगामातील कसर भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रबी व भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली़ परंतु निसर्गाच्या लहरीपणा रबीला आडवा आला़ गारपिटीने शिवारात गारांचे ढीग साचले़ त्याचा फटका जवळपास ६० गावांना बसला़ शिवारातील हिरव्या पिकाकडे पाहून आनंद व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांना दीर्घकाळ आनंद लुटता आला नाही़ त्यापूर्वी भाजीपाला लागवड केलेल्या शेतकऱ्यांनाही अपेक्षित भाव मिळाला नाही़ सहा महिन्यांपूर्वी उपलब्ध जलसाठ्याने लागवड केलेला भाजीपाला मुबलक होता़ त्यामुळे ग्राहकांची मोठी चंगळ झाली़ परंतु शेतकऱ्यांना मात्र याचा मोठा भूर्दंड सहन करावा लागला़ आता मात्र उलटे चित्र झाले आहे़फळभाज्या व पालेभाज्यात जीवनसत्वे असल्याने नागरिक आहारात त्याचा वापर करतात़ आणि आपले आरोग्य अबाधित ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात़ शेतकऱ्यांना लागवड परवडली पाहिजे, आणि उत्पन्न अपेक्षित मिळाले पाहिजे़ तसेच नागरिकांनाही खरेदीचा भाव परवडून आरोग्य चांगले ठेवणे आवश्यक असते़ परंतु याचा ताळेबंद निसर्ग लहरीपणाने कमालीचा बिघडत चालला आहे़ कधी शेतकरी आर्थिक गर्तेत जात आहे़ तर कधी ग्राहकाच्या खिशाला मोठी कातर लागत आहे़आषाढ महिना भर पावसाचा असतो़ पावसाळ्यात भाजीपाला स्वस्त मिळतो, असा संकेत दरवर्षी असतो़ त्याला निसर्गाने छेद दिला असल्याचा अनुभव सर्वांना येत आहे़ आगामी काळात पावसाची हजेरी यावरच भाजीपाला उत्पादन व भाव अवलंबून आहे़ (वार्ताहर)माहुरातही भाजीपाला कडाडलाश्रीक्षेत्र माहूर : पाऊस वेळेवर न झाल्याने पावसाळी भाजीपाला अभावी भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडल्याने दोन रुपये किलोने मिळणारे टमाटे १२० रुपये किलोवर गेल्याने सोमवारी माहूरच्या बाजारात शुकशुकाट तर मजुरी नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून शेतातील बांधावर व गावातील पडीक जागेत उगवणाऱ्या तरोट्याची भाजी खाण्याची वेळ आली असून सर्वच भाजीपाला जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने नोकरदारांचे आर्थिक बजेट कोलमडले़सोमवारी माहूरच्या बाजारात पाऊस न झाल्याने अत्यल्प भाजीपाला आला होता़ त्यात घराचे आर्थिक बजट सांभाळणाऱ्या महिला वर्गाची भाजी खरेदीसाठी गर्दी तर पवित्र रमजान महिना असल्याने मुस्लिम बांधवांनीही प्रचंड गर्दी केली होती़ भाजीपाला कमी आल्याने त्यातच भाजीपाला व इतर वस्तूंचे भाव प्रचंड वाढल्याने किरकोळ विक्रीत टमाटे १२० रुपये किलो, आलू ४० रुपये किलो, हिरवी मिरची ८० रुपये, फूलकोबी १२० रुपये, अद्रक २०० रुपये, सांभार १०० रुपये, मेथीची भाजी १०० रुपये किलोप्रमाणे विक्री होत होता़ इतर भाजीपाला दुपारी १२ वाजेपर्यंत संपला़ तर सुकामेवा, टरबूज, पेंडखजूर व इतर साहित्याची प्रमाणाबाहेर दर झाल्याने ग्राहकांकडून खरेदी कमी तर दरांची चौकशीच अधिक होताना दिसल्याने व्यापारीही वैतागलेल्या अवस्थेत तर ग्राहक संतापलेल्या अवस्थेत दिसत होते़ माहूर तालुक्यात जुलै महिना संपत आला तरीही पेरणीलायक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी केलेली तिबार पेरणीही मातीत मिसळल्याने व कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यापासून वेतन न आल्याने मजुरांनाही रोजगार नाही़ त्यातल्या त्यात भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने आर्थिक परिस्थितीत सुदृढ असलेल्या नागरिकांनाही तान सहन करावा लागत असल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त आहे. (वार्ताहर)सहा महिन्यापूर्वीचे जुलै २०१४भाव मधील भावकांदा ४० रूपये किलो ८० रुपयेहिरवी मिरची ४०-६० ८० ते १०० दोडके ४० ते ५० रू़ ८० ते ९०मेथी ३० ते ४० रू़ ८० ते १०० कोथींबीर ३० ते ४० रू़ १८० ते २००वांगे २० ते ३० रु़किलो ४० ते ५०टमाटे २० ते ३० रु़कि़ ८० रू़कि़
कंधारात मिरची-कांद्याचा वांदा
By admin | Updated: July 22, 2014 00:18 IST