शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांत केवळ सात अर्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेवर पितृपक्षाचा मोठा परिणाम जाणवत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेवर पितृपक्षाचा मोठा परिणाम जाणवत असून तीन दिवसांत केवळ ७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महापालिकेच्या २० प्रभागांतर्गत ८१ वॉर्डासाठी ११ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. शनिवारपासून या प्रक्रियेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जात आहेत. मनपा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच आॅनलाईन प्रक्रियेचा वापर केला जात आहे. पहिल्या दिवशी प्रभाग १३ ब एकमेव अर्ज आला होता. त्यानंतर रविवारी  सुटीच्या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले नाहीत. सोमवारी प्रभाग ११ क मध्ये शाहिस्ता तनवीर म. जावेद, प्रभाग १३ क मध्ये पठाण जिनत खान जफर अली खान आणि प्रभाग १३ ड मध्ये पठाण जफर अली म. अली खान आणि पठाण म. नवीन खान जफर अली खान या चार उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. मंगळवारी तिसºया दिवशी केवळ दोन उमेदवारी अर्ज मनपा निवडणुकीत प्राप्त झाले आहेत. प्रभाग ८ ड मध्ये प्रकाश देवीदास रोकडे आणि १२ ड मध्ये शाख अन्वर खुरेशी शे. खासीम कुरे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराकडून  मुहूर्त शोधला जात आहे. सध्या पितृपक्ष सुरू असल्याने या कालावधीत बहुतांश उमेदवारांनी उमेदवारी दाखल करण्याचे टाळलेच आहे. २० सप्टेंबर रोजी पितृपक्ष संपणार आहे. त्यानंतर उर्वरित तीन दिवसांत उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी गर्दी होणार आहे. त्यात शेवटच्या दिवशी दमछाक होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज मात्र भरले जात आहेत. शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या ८, ९, १० या प्रभागासाठी आतापर्यंत ३५ उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. उमेदवारांना २४ तास आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. या आॅनलाईन अर्जाची प्रत भरण्यासाठी उमेदवारांनी निवडणूक कार्यालयात यावे लागत आहे. तो अर्ज सादर केल्यानंतरच उमेदवारांची उमेदवारी ग्राह्य धरली जाणार आहे. शेवटच्या दिवसांत गर्दी टाळण्यासाठी वेळीच अर्ज दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने केले़