शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’मध्ये ठेकेदारांची दांडगाई !

By admin | Updated: February 19, 2016 00:38 IST

राजेश खराडे , बीड जलयुक्त अभियानातील कामे मिळवून निधी मुरविण्यासाठी आता ठेकेदार कृषी अधिकाऱ्यांना थेट धमक्यांची भाषा करू लागल्याचे गुरूवारी समोर आले.

राजेश खराडे , बीड जलयुक्त अभियानातील कामे मिळवून निधी मुरविण्यासाठी आता ठेकेदार कृषी अधिकाऱ्यांना थेट धमक्यांची भाषा करू लागल्याचे गुरूवारी समोर आले. यामुळे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याच जिल्ह्यात अभियानाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एप्रिल २०१६ पासून होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील कामांकरिता जिल्ह्यातील २४२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. गावांची नावे जाहीर होताच स्थानिक पातळीवरील गुत्तेदारांमध्ये हालचाल सुरू झाली आहे. तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या कामांचाही समावेश करून बिले अदा करण्याविषयीच्या धमक्या थेट अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत. सद्य:स्थितीला केवळ गावांची नावे जाहीर झाली असून, आवश्यकतेनुसार कामांची यादी जाहीर केली जाणार आहे. याकरिता दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. निविदा पद्धतीमुळे अडचणीत आलेल्या ठेकेदारांनी धमकीसत्र सुरू केले आहे. जलयुक्त अभियानाचीही अवस्था रोहयोप्रमाणेच होते की काय, अशी स्थिती आहे. तालुकानिहाय गावे बीड - ३२, शिरूर - २७, आष्टी -२३, पाटोदा - २२, केज - २९, अंबाजोगाई - २५, परळी - २०, गेवराई - २७, माजलगाव - १४, वडवणी - १२, धारूर - ११.