शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या-विमुक्तांचा धडकला जोरदार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:10 IST

आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय भटके विमुक्त आदिवासी संघर्ष महासंघाच्या वतीने आज क्रांतीचौकातून मोठा मोर्चा काढण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय भटके विमुक्त आदिवासी संघर्ष महासंघाच्या वतीने आज क्रांतीचौकातून मोठा मोर्चा काढण्यात आला. तो विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. तेथे झालेल्या जाहीर सभेत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.जिल्ह्याच्या कानाकोपºयातून भटक्या-विमुक्त समाजाचे स्त्री-पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते. त्यात अनेक जण पारंपरिक वेषभूषेत होते. एकलव्य, संत रविदास, सेवालाल महाराज, शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाऊ, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचा जयजयकार मोर्चेकरी करीत होते. दोन-दोनच्या रांगेत प्रत्येक जण चालत होता. लाऊडस्पीकरवरून त्यांना संयोजकांतर्फे योग्य त्या सूचना दिल्या जात होत्या.या मोर्चात सहभागी झालेल्या बहुतांश जणांजवळ रेशन कार्ड नाही, मतदान कार्ड नाही, आधार कार्डही नाही. शिवाय राहायला घरही नाही. अनेक जणांनी शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या अशा- सीमा राठोड या बंजारा समाजाच्या मुलीच्या निर्घृण हत्येची कसून चौकशी करून दोषींना फाशी देण्यात यावी, वन विभागाच्या जमिनी व गायरान जमिनी कसणाºयांच्या नावे सातबारा करण्यात यावा, जातीचे दाखले, रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड घरपोच देण्यात यावेत, आदिवासी शबरी माता विकास महामंडळाला एक हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, या महामंडळाचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यात यावे, वसंतराव नाईक महामंडळाची कर्जे माफ करण्यात यावीत, शिक्षणाचे खाजगीकरण रद्द करण्यात यावे, आदिवासी, भटक्या, विमुक्त व ओबीसी शेतकºयांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी, भिल्ल- आदिवासी, भटके- विमुक्त सगाजाचे लोक ज्या गावात राहतात, त्या गावाचे तळे मच्छीमारासाठी उपलब्ध करून द्यावे, मंडल आयोगाच्या शिफारशींची शंभर टक्के अंमलबजावणी करून ओबीसींना न्याय देण्यात यावा.महासंघाचे अध्यक्ष अशोक जाधव धनगावकर व कार्याध्यक्ष राजपालसिंह राठोड यांनी या मोर्चाचे संयोजक म्हणून काम पाहिले. प्राचार्य ग.ह. राठोड, अंबादास राठोड, प्राचार्य सुनील वाकेकर, मुकुंद सोनवणे, जि.प. सदस्य रमेश गायकवाड, प्रा. प्रकाश वाघमारे, पंडित चव्हाण, राजेंद्र जाधव, गोरख मोरे, नामदेव दळवे, अशोक मोरे, डॉ. कृष्णा राठोड, ज्ञानेश्वर ढाकणे, गणेश चव्हाण, प्रा. आर.जी. देठे, पल्लवी खंडेराव, अंकुश चव्हाण, अजित तडवी, सुनील कचरू ठाकरे, जगन बाबर, बाबालाल जाधव, महादू पगारे, अरविंद कांबळे, दादाराव आळणे, प्रदीप त्रिभुवन, धम्मानंद गायकवाड, विनोद वाघमारे, रत्नदीप कांबळे, कोंडबा हटकर, मिलिंद वानखेडे, महादेव आंधळे, विष्णू वखरे, डॉ. शरद वानखेडे, संजय मेडे, अजित तडवी आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले. खोजेवाडी, वडगाव, दिवशी पिंपळगाव, रांजणगाव पोळ, सिद्धिशिरसगाव, दायगाव, देहडे, गाजगाव, पिंपळगाव खंडाळा, वैरागड, खडक नारळा, डोणगाव, बाभूळगाव नांगरे, टाकळी, वडाची वाडी, टुणकी, टेंभी, पालखेड, कानडगाव, शिरोडी, तुर्काबाद खराडी, कौडगाव, देवगाव रंगारी, फेरन जळगाव, चौका, पिंपळखुंटा, दौलताबाद, बोरसर आदी गावांमधून हे भटके-विमुक्त आले होते.