शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात साडेतीन हजार ग्राहकांना न्याय

By admin | Updated: March 15, 2016 01:06 IST

गजेंद्र देशमुख , जालना ग्राहकांची फसवूणक होऊ नये, झाल्यास त्यांना न्याय मिळावा म्हणून ग्राहक मंच आहे. या ग्राहक मंचात स्थानिक सोबतच आॅनलाईन

गजेंद्र देशमुख , जालनाग्राहकांची फसवूणक होऊ नये, झाल्यास त्यांना न्याय मिळावा म्हणून ग्राहक मंच आहे. या ग्राहक मंचात स्थानिक सोबतच आॅनलाईन खरेदी दरम्यान झालेल्या फसवुणकीबाबतही न्याय मिळतो. मंगळवारी होणाऱ्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहकमंचच्या अध्यक्षा अ‍ॅड. नीलिमा संत यांनी विविध मुद्यांवर ग्राहक हितांची जाणीव करून दिली.दरवर्षी १५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. व्यावसायिक व ग्राहक यांचे नाते खरेदीपुरतेच असल्याने सौहार्दपूर्ण असते. मात्र, उत्पादनात अथवा एखाद्या वस्तूत बिघाड आल्यास ग्राहक व व्यासायिकांत तणावपूर्ण संबंध बनतात. यातूनच कोर्ट कचेऱ्या होतात. काही ग्राहक ग्राहकमंचचा पर्याय निवडतात. ग्राहक मंच ग्राहकांचे हित व कर्तव्याची जाणिव करून देते. ग्राहक हिताला प्राधान्य देणारी ही संस्था असल्याचे संत यांनी सांगितले. गत वर्षभरात १३ विविध प्रकारांत मिळून ३ हजार ६३५ तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. पैकी ३ हजार ५५७ तक्रारींचे निराकरण करून ग्राहकांना न्याय देण्यात आला. गत दोन ते तीन वर्षांत आॅनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा ओढा वाढत आहे. याबरोबरच ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाणही वाढत असल्याबाबत संत म्हणाल्या, आॅनलाईन खरेदी केली तरी ग्राहकांना ग्राहकमंचात दाद मागता येते. न्यायही मिळू शकतो. मात्र ग्राहकांकडे वस्तू खरेदी केल्याची परिपूर्ण माहिती, पावत्या, संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक तसेच इतर पुरावा घेऊन ग्राहकमंचात तक्रार केल्यास न्याय मिळण्यास निश्चित मदत मिळू शकते. आॅनलाईन खरेदी केली आता तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न ग्राहकांना पडत असतो. मात्र आॅनलाईन तक्रारीही ग्राहकमंचा निकाली निघू शकतात. संत यांनी सांगितले की, शक्यतो कॅश आॅन डिलेव्हरीच करावी, आलेले पार्सल कुरिअरमन समक्षच फोडावे.कोणतीही वस्तू खरेदी केल्यावर तिची पक्की पावती ग्राहकांनी मागावी. तो त्यांचा हक्क आहे. मात्र कर जास्त लागतो म्हणून ग्राहक पक्की पावती मागण्याचे टाळतात. ४सोने असो अथवा एखादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पक्की पावती मागितल्यास त्याचा फायदा ग्राहकांनाच होत असल्याचे ग्राहक मंचच्या अध्यक्षा संत म्हणाल्या. ४त्याचबरोबर तुम्हाला लॉटरी लागली, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले. तुमचा एटीएम क्रमांक द्या आदी अफावांवर ग्राहकांनी अजिबात विश्वास ठेवू नये. त्या पूर्ण फसव्या असतात.