शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकाराची आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:51 IST

येथील पत्रकार जगदीश बेदरे यांच्या आत्महत्येने शहरात खळबळ उडाली होती. त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरून माजी नगरसेवकासह अन्य एकावर गुन्हा दाखल झाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : येथील पत्रकार जगदीश बेदरे यांच्या आत्महत्येने शहरात खळबळ उडाली होती. त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरून माजी नगरसेवकासह अन्य एकावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गुरूवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर त्यांना ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.पत्रकार बेदरे यांनी बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळुन आली होती. प्लॉट खरेदी विक्रीच्या व्यवहारातुन लोकांच्या रजिस्ट्रि व कमिशन पोटी देवु केलेला प्लॉट गेवराई येथील माजी नगरसेवक दादासाहेब घोडके व कृष्णा मुळे देत नाहीत व मागणी केल्यास जिवे मारण्याच्या धमक्या देतात, अशी माहिती बेदरे यांनी वडील व भावंडांना काही दिवसांपुर्वी दिली होती. ताकडगाव रोड व सोनवाडी परिसरात दादासाहेब घोडके व कृष्णा मुळे याचे प्लॉट हप्त्यावर विक्री करून पैसे जमा केले होते. अनेकवेळा रजिस्ट्रिची मागणी करूनही ते करून देत नव्हते. त्यामुळे माझ्या भावाने आत्महत्या केली, अशी फिर्याद जगदीश यांचा भाऊ अनिल बेदरे यांनी गेवराई पोलीस ठाण्यात दिली आहे. यातील कृष्णा मुळे याला अटक केली असून चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दादासाहेब घोडके हा फरार आहे. तपास पोलीस निरिक्षक सुरेश बुधवंत हे करीत आहेत.