शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जि़प़सदस्यांनी घेतली शिक्षणाधिकाºयांची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:22 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या, गणवेश वाटपातील दिरंगाई, वर्गखोल्या, शिक्षकांच्या रिक्त जागा आदी प्रश्नांची सरबत्ती करीत जिल्हा परिषद सदस्यांनी शिक्षण विभाग आणि शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांना धारेवर धरले़ काम करायची इच्छा नसेल तर शिक्षण विभाग सोडून द्या, मात्र जिल्ह्यातील शिक्षणाचे वाटोळे करू नका, असा सल्लादेखील काही सदस्यांनी दिला़

श्रीनिवास भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या, गणवेश वाटपातील दिरंगाई, वर्गखोल्या, शिक्षकांच्या रिक्त जागा आदी प्रश्नांची सरबत्ती करीत जिल्हा परिषद सदस्यांनी शिक्षण विभाग आणि शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांना धारेवर धरले़ काम करायची इच्छा नसेल तर शिक्षण विभाग सोडून द्या, मात्र जिल्ह्यातील शिक्षणाचे वाटोळे करू नका, असा सल्लादेखील काही सदस्यांनी दिला़शनिवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जि़प़ची सर्वसाधारण सभा पार पडली़ यावेळी जि़प़ सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, प्रकाश देशमुख, पूनम पवार, मंगाराणी अंबुलगेकर, दशरथ लोहबंदे यांच्यासह अनेक सदस्यांनी शिक्षण विभागामध्ये कोणतीच कामे वेळेत होत नसून शिक्षणाधिकाºयांना शाळांना भेटी द्यायलाही फुरसत मिळत नाही, अशा तक्रारी केल्या़ यानंतर शिक्षण विभागातील प्रलंबित कामे आणि प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणी केली़ त्यानंतर जि़ प़ अध्यक्ष शांताबाई पवार जवळगावकर यांनी ८ सप्टेंबर रोजी विशेष सभा घेण्याचा निर्णय घेतला़ या सभेस शिक्षणाधिकारी यांनी स्वत: हजर राहण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी यांनी यावेळी दिले़जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आपसी बदल्या, आंतरजिल्हा बदल्या, पती-पत्नी एकत्रीकरणातील बदल्या नियमानुसार झाल्या नाहीत, १२० पैकी ८६ शिक्षकांना पदस्थापना चुकीच्या पद्धतीने दिली, त्याचबरोबर जिल्ह्यातील २१५ अवघड क्षेत्र निवड करताना सभापती, सदस्यांना माहिती दिली नाही, शिक्षक उपस्थित असूनदेखील त्यांना १५ दिवसांपर्यंत गाव देण्यात आले नाही, मोफत पुस्तके आणि गणेवश आजपर्यंत विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत, मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्न सुटत नाही आदी प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले़