आळंद : सिल्लोडकडून येणाऱ्या काळी-पिवळी मोटारीने धडक दिल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार, तर अन्य पाच जण जखमी झाले. जखमीत काळी-पिवळीमधील प्रवाशांचा समावेश आहे.येथून जवळच असलेल्या खेडी भायगाव फाटा येथे ही दुर्घटना घडली. काळी-पिवळी जीपने (क्र. एमएच-२०, एए-६५३६) दुचाकीला (एमएच-२० एपी-३६) ला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार किशोर हरिभाऊ नवगिरे, रा. तलवाडा हा जागीच ठारझाला. या अपघातात काळी-पिवळीमधील प्रवासी लताबाई शेषराव हिंगमिरे, कमलाबाई दादा धुमाळ, लक्ष्मीबाई बाबूराव धुमाळ, शेषराव हिंगमिरे (सर्व रा. सताळा, ता. फुलंब्री) हे जखमी झाले. या काळ्या-पिवळीने कारलाही (क्र.एमएच-२० बीआर-५६६४) खरचटले.
जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By admin | Updated: August 6, 2014 02:36 IST