शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

जयश्री कुलकर्णी पुन्हा खंडपीठात

By admin | Updated: September 21, 2016 00:18 IST

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांना मनपा आयुक्तांनी स्वच्छ महाअभियान आणि मलेरिया

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांना मनपा आयुक्तांनी स्वच्छ महाअभियान आणि मलेरिया विभागप्रमुख म्हणून केलेल्या अतिरिक्त पदस्थापनेस खंडपीठात आव्हान दिले आहे. न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. के.एल. वडणे यांनी नगरविकास आणि आरोग्य विभागाच्या सचिवांसह महापालिकेला नोटीस बजावण्याचा आदेश दिला. याचिकेची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे. डॉ. कुलकर्णी या पूर्वी महापालिकेत आरोग्य अधिकारी होत्या. ते पद रिक्त झाल्यामुळे महापालिकेच्या निवड समितीने डॉ. कुलकर्णी यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्याची शिफारस केली. मात्र मनपाच्या सर्वसाधारण सभेने तो ठराव नामंजूर केला. म्हणून डॉ. कुलकर्णी यांनी शासनाकडे धाव घेतली. नगरविकास विभागाने मनपाचा ठराव विखंडित केला. १३ मे २०१५ रोजी मनपा आयुक्तांना आदेश देऊन डॉ. कुलकर्णी यांना वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी पदावर पदोन्नतीने नियुक्ती देऊन शासनाकडे अहवाल सादर करण्यास सांगितले. त्यानुसार मनपा आयुक्तांंनी २४ जून २०१५ रोजी डॉ. कुलकर्णी यांना वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी पदावर पदोन्नतीने नियुक्ती दिली. दरम्यान, डॉ. कुलकर्णी रजेवर असताना मनपाच्या जुन्या ठरावाचा संदर्भ देत डॉ. सुहास जगताप यांना ३० सप्टेंबर २०१५ रोजी प्रतिनियुक्तीवर वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी पदावर महापालिकेत रुजू करून घेण्यात आले. त्यामुळे ‘एक पद आणि दोन अधिकारी’ अशी परिस्थिती निर्माण झाली. डॉ. कुलकर्णी यांनी त्यावेळी खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने शासनाला याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, शासनाने आजपर्यंत निर्णय घेतला नाही. मनपात एका पदावर दोन अधिकारी कार्यरत असल्यामुळे अडचण निर्माण झाली असून डॉ. जगताप यांची प्रतिनियुक्ती रद्द करावी, असे आयुक्तांनी शासनाला कळविले असल्याचे डॉ. कुलकर्णी यांचे म्हणणे आहे. मनपा आयुक्तांनी २० आॅगस्ट २०१६ रोजी एका प्रशासकीय आदेशाद्वारे डॉ. कुलकर्णी यांना स्वच्छ महाअभियान आणि मलेरिया विभागप्रमुख म्हणून नियुक्ती दिली. त्यावर डॉ. कुलकर्णी यांनी आक्षेप घेऊन म्हटले आहे की, त्यांची नियुक्ती कायद्यानुसार वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी पदावर झाली आहे. प्रशासकीय आदेशाद्वारे त्या पदावरून त्यांना हटविता येणार नाही.आयुक्तांचा २० आॅगस्टचा आदेश अतिरिक्त कार्यभार म्हणून स्वीकारत आहोत. आपण वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी म्हणून कार्यरत आहोत. डॉ. जगताप यांनी हस्तक्षेप करू नये, असा आदेश देण्याची विनंती डॉ. कुलकर्णी यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली. या पार्श्वभूमीवर डॉ. कुलकर्णी यांनी अ‍ॅड. बी.एल. सगर किल्लारीकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. आयुक्तांचे आॅगस्ट २०१६ मधील अतिरिक्त पदस्थापनेचे आदेश रद्द करावेत. तसेच आपणास वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी म्हणून काम करूदेण्याचे आदेशित करावे, अशी विनंती डॉ. कुलकर्णी यांनी केली आहे. मनपातर्फे अ‍ॅड. दिलीप बनकर पाटील काम पाहत आहेत.