शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जालना बसस्थानकाचे रूपडे पालटणार..!

By admin | Updated: January 11, 2017 00:13 IST

जालना एक कोटीच्या खर्चातून स्थानकाचा चेहरा- मोहराच बदलला जाणार आहे.

हरी मोकाशे जालनावाऱ्याच्या झुळुकानेच फिरणारे बहुतांशी पंखे, रात्रीच्यावेळी काजव्याप्रमाणे चमकणारे काही विद्युत दिवे आणि बसण्यासाठी मोडतोड झालेले आसन. अशी जालन्याच्या बसस्थानकाची अवस्था आहे. परंतु, प्रवाशांना होणारा हा त्रास आता लवकरच दूर होणार आहे. एक कोटीच्या खर्चातून स्थानकाचा चेहरा- मोहराच बदलला जाणार आहे.‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ध्येय उराशी बाळगून असलेल्या एसटी महामंडळाच्या शहरातील बसस्थानकास सध्या विविध समस्यांनी घेरले आहे. स्थानकात येणाऱ्या बसचे स्वागत खड्ड्यांनी होते. काही वर्षांपूर्वी स्थानकाचे डांबरीकरण करण्यात आले असले तरी ते पूर्णपणे करण्यात न आल्याने अर्धवट झालेले डांबरीकरणही काही प्रमाणात उखडले आहे. तसेच प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या सिमेंट क्राँकिटच्या आसनाची दैना उडाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत उन्हातून आलेल्या प्रवाशांना थंड हवा मिळावी म्हणून पंखे बसविण्यात आले असले तरी त्यातील बहुतांशी पंखे आजघडीला बंद आहेत. त्याचबरोबर स्थानकातील काही विद्युत दिवे बंद आहेत. परिणामी, रात्रीच्यावेळी आलेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. तसेच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. जालना आगारात ८० बसेस असून स्थानकातून दररोज विविध आगारांच्या ६७५ बसेस धावतात. त्यामुळे प्रवाशांची वर्दळ असते. स्थानकात मुलभूत सुविधा नसल्याने प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागते. दरम्यान, शासनाने जालना स्थानकाच्या विकासासाठी १ कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्याने आठवडाभरात स्थानकाच्या नूतनीकरणास सुरुवात होणार आहे.