शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

जालना रोड, बीड बायपास ‘बीओटी’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 01:04 IST

औरंगाबाद : बहुचर्चित आणि प्रतीक्षेत असलेल्या जालना रोड, बीड बायपास रुंदीकरण प्रकल्पाला घरघर लागण्याची चिन्हे आहेत.

विकास राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बहुचर्चित आणि प्रतीक्षेत असलेल्या जालना रोड, बीड बायपास रुंदीकरण प्रकल्पाला घरघर लागण्याची चिन्हे आहेत. ७८९ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा ‘स्कोप’ कमी करून ‘बीओटी’वर करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एनएचएआय) दिल्लीतील मुख्यालयात झालेल्या बैठकीत या प्रकल्पावर कुठलीही ठोस अशी चर्चा झाली नाही; मात्र प्रकल्पाचा ‘स्कोप’ कमी करून ‘बीओटी’वर करण्यासाठी चिंतन झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या बैठकीत मोघम चर्चा झाली. त्या प्रकल्पाचा ‘स्कोप’ कमी करण्याचे चालले आहे. हा एकच प्रकल्प नाही तर देशातील ज्या-ज्या शहरांतील रस्ते प्रकल्प एनएचएआयकडे आले आहेत, त्याबाबत एकत्रितच विचार होण्याचे संकेत आहेत. दोन आठवड्यांत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी याबाबत निर्णय घेणार आहेत. काही तरी चांगला मार्ग निघणे अपेक्षित आहे. बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरण करा) या तत्त्वावर किंवा इतर काही पर्याय शोधण्यात येणार आहे. हे काम थांबणार किंवा रद्द होणार नाही; पण ‘स्कोप’ कमी करण्याचा मुद्दा पुढे आल्यामुळे वरिष्ठ काय निर्णय घेतात, याकडे लक्ष आहे. २०१५ पासून जालना रोड, बीड बायपास रुंदीकरणाचा प्रस्ताव चर्चेत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याचा डीपीआर तयार करून एनएचएआयकडे पाठविला. १० महिन्यांपासून त्या प्रकल्पाच्या निविदा निघू शकल्या नाहीत. या प्रकल्पावर सहा ते आठ बैठका आजवर झाल्या. येथील प्रकल्प विभागाने थ्रीडी डिझाइन तयार करून तेही मुख्यालयाला सादर केले आहे. ‘स्कोप’ कमी करणे म्हणजे प्रस्तावित केलेली कामे कमी करणे होय. आहे त्या कामाच्या प्रस्तावामध्ये काही तरी पर्याय काढणे. ‘स्कोप आॅफ वर्क’मध्ये ज्या काही तरतुदी किंवा संकल्पित आराखडा तयार केला आहे, त्यातील काही कामे कमी करून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निर्णय घेणे म्हणजे ‘स्कोप’ कमी करणे होय. थोडक्यात कामांचा ‘वाव’ कमी होणे आहे. ७८९ कोटींपैकी कमी खर्चात हा प्रकल्प पूर्ण करण्याबाबत निर्णय होईल,अशी चर्चा आहे. जालना रोड १४ कि़मी., बीड बायपास १४ कि़मी.चे फक्त रुंदीकरण करण्यासाठी विचार होण्याची शक्यता आहे.