शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

बजाजनगरात भाजपतर्फे जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:05 IST

वाळूज महानगर : राज्यसभा खा. डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल आज, गुरुवारी बजाजनगरात भाजप पदाधिकाऱ्यांतर्फे ...

वाळूज महानगर : राज्यसभा खा. डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल आज, गुरुवारी बजाजनगरात भाजप पदाधिकाऱ्यांतर्फे फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. येथील मोहटादेवी मंदिर परिसरात सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास जि. प. सदस्या ज्योती चोरडिया, तालुका प्रमुख वसंत प्रधान, पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमित चोरडिया, विजय सूर्यवंशी, दादासाहेब खणसे, सुदर्शन वाघ, अंकुश पुंड, सुनीता अहिरे, मनीषा देशमुख, नंदा राजपूत, आशिष पावडे, मयूर चोरडिया, आदींनी फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटून जल्लोष केला.

---------------------

वाळूज येथून दुचाकी लांबविली

वाळूज महानगर : वाळूज येथून दुचाकी लांबविणाऱ्या अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब मारुती अभंग (रा. अंजिक्यतारा सोसायटी, वाळूज) यांनी २ जुलैला रात्री दुचाकी (एम.एच.२०, बी.एच.५६१०) घरासमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली.

-----------------------

रांजणगावात रस्त्याचे काम सुरू

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते कमळापूर फाटा या रस्त्याचे सिमेंटीकरणाचे काम ग्रामपंचायतीच्यावतीने सुरू करण्यात आले आहे. या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत होता. दोन-तीन महिन्यांपूर्वी या रस्त्याचे एका बाजूचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या बाजूचे काम सुरू करण्यात आल्याने वाहनधारक व नागरिकांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.

------------------------

जोगेश्वरीत जि. प. शाळेलगत साचले पाणी

वाळूज महानगर : जोगेश्वरी जिल्हा परिषद शाळेलगत असलेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याचे तळे साचले आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसल्याने ठिक-ठिकाणी पावसाचे पाणी साचत असून, ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्याची व्यवस्था करण्याची मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.

-------------------