शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘जय जिजाऊ- जय शिवराय’

By admin | Updated: January 13, 2017 00:32 IST

बीड : जय जिजाऊ- जय शिवराय अशा गगनभेदी घोषणांसह सळसळत्या वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने शहरवासियांच्या डोळ्याचे गुरुवारी अक्षरश: पारणे फेडले.

बीड : कंदिलाची आकर्षक विद्युत रोषणाई... ढोलताशांचा निनाद... डौलाने फडकणारे भगवे झेंडे... जय जिजाऊ- जय शिवराय अशा गगनभेदी घोषणांसह सळसळत्या वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने शहरवासियांच्या डोळ्याचे गुरुवारी अक्षरश: पारणे फेडले. उंट- घोडे, झांज, तलवार, दांडपट्टा पथकांनी सादर केलेल्या कलांतून शिवकालीन इतिहासाचा पटही उलगडला. छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेतील बालके... फुलांनी सजवलेल्या रथातील राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा... हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले.राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महिनाभरापासून संयोजन समितीतर्फे जय्यत तयारी सुरु होती. गुरुवारी सकाळी प्रियदर्शनी गार्डनमधील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. तेथे दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलापासून मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ध्वजपूजन झाले. भगवा झेंडा डौलाने झळकावून मिरवणूक मार्गस्थ झाली. यावेळी मिरवणुकीत सहभागी महिला- मुलींच्या डोक्यावर भगवे फेटे होते. ठिकठिकाणी या मिरवणुकीचे शहरवासियांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ठिकठिकाणी रस्त्यांवर व घरांच्या छतावर मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी दिसून आली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वयंसेवकांनी रस्त्याच्या दुतर्फा हाताची साखळी केली होती. अग्रभागी पोलीस व स्वयंसेवक मिरवणुकीसाठी रस्ता मोकळा करत होते. सुभाष रोड, माळीवेस, धोंडीपुरा, बलभीम चौक, कारंजा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून नगररोड मार्गे मिरवणूक राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. तेथे जिजाऊ वंदना घेण्यात आली. त्यानंतर शाहीर संतोष साळुंके यांच्या पोवाड्याच्या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)