जालना : वीस पेक्षा कमी पट संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, तो योग्य आहे. सदर विद्यार्थ्यांची योग्य पर्यायी व्यवस्थाही तितकीच महत्वाची असल्याचे मत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे संचालक मनोज देशमुख यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत वीसपेक्षा कमी संख्या असतील त्या बंद होणार आहेत. त्या अनुषंगाने देशमुख यांनी आपले विस्तृत मत व्यक्त करीत शिक्षकांपेक्षा विद्यार्थी गुणवत्ता महत्वाचे असल्याचे रोखठोक सांगितले. सर्वप्रथम जिल्ह्यात अशा शाळा किती आहेत, तेथे विद्यार्थी किती आहेत ते कसे प्रभावित होऊ शकतात याचा अभ्यास करण्याची गरज आहे. शाळा बंद केल्या तरी विद्यार्थ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांची पर्यायी व्यवस्था करलेच. अशा विद्यार्थ्यांसाठी जवळची शाळा कोणती, त्या शाळेपर्यंत मानव विकासच्या बसेसची व्यवस्था करणे, अथवा काही सामूहिक व्यवस्था केल्यास विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटू शकतो. ५ विद्यार्थ्यांसाठी शासन ६० ते ७० हजार रूपये खर्च करते. तेही योग्य नाही. उलट त्या शाळा बंद करण्यास हारकत नाही. शिवाय ५ ते ६ विद्यार्थी जास्त संख्या असलेल्या शाळेत गेल्यास त्यांचा शैक्षणिक विकास गतीने होऊ शकतो. तेथे सुविधा असतात. विषयाला शिक्षक असतात. गटांतून विद्यार्थी पुढे जातात. अंबड अथवा इतर ठिकाणांहून विद्यार्थी जालना शहारातील शाळांमध्ये येतात. त्यांचा काही प्रश्न नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था व्हावी. (प्रतिनिधी)
२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणे योग्यच
By admin | Updated: March 19, 2016 00:43 IST