शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ शासनादेश विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक

By admin | Updated: November 22, 2015 23:42 IST

बीड : अनुसूचित जाती- जमाती निवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य अप्रशिक्षित शिक्षकांच्या हातात आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

बीड : अनुसूचित जाती- जमाती निवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य अप्रशिक्षित शिक्षकांच्या हातात आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने २०१० मध्ये अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांचे हित जपणारा आदेश काढून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा घाट घातला आहे. हा शासनादेश मागे घ्यावा अशी मागणी रविवारी मनविसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव यांनी केली.केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत अनुसूचित जाती- जमातीतील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक- माध्यमिक आश्रमशाळा जागोजागी उभारण्यात आल्या आहेत. २६ जुलै २०१० मध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने आश्रमशाळांमध्ये नियुक्तीसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्यासाठी पाच वर्ष मुदत दिली. शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्याच्या अटीवर सेवा ग्राह्य धरण्याचे आदेशात नमूद होते. या निर्णयामुळे काही संस्थांचालकांनी सर्रास अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांची भरती केली. यातून मोठी ‘उलाढाल’ही झाली. अनुसूचित विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी प्रशिक्षित व आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले शिक्षकच असायला हवेत, अशी मागणी मनविसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव यांनी केली आहे. हा निर्णय अनुसूचित जाती- जमाी विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असून तो तात्काळ रद्द करुन त्यात सुधारणा करावी, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)