शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या फसवणुकीचा तपास कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:02 IST

औरंगाबाद : सामान्य नागरिकांची फसवणूक झालेल्या अनेक प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून कासव गतीने होत आहे. यात ...

औरंगाबाद : सामान्य नागरिकांची फसवणूक झालेल्या अनेक प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून कासव गतीने होत आहे. यात व्हाइट कॉलर आरोपी असल्यामुळे ते सापडत नाही, असा दावा पोलिसांकडून केला जातो. आरोपीच सापडले नसल्यामुळे २०२० मध्ये तपासांवर असलेल्या १२ पैकी केवळ दोन गुन्ह्यांचे दोषारोपपत्र पोलिसांना न्यायालयात सादर करता आले.

२५ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीची तक्रार असेल तर अशा प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येतो. पोलीस आयुक्तांची शाखा म्हणून आर्थिक गुन्हे शाखेकडे पाहिले जाते. आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी थेट पोलीस आयुक्ताना रिपोर्टिंग करतात. २०२० मध्ये औरंगाबाद शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविलेल्या गुन्ह्यांपैकी १२ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक डी. एस. सिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली चार अधिकाऱ्यांची पथके करीत असतात.

मोठ्या रकमेची फसवणूक करणारे आरोपीही व्हाइट कॉलर असतात. अशा आरोपींना अटक करणे, फसवणूक करून मिळविलेल्या पैशांतून आरोपींनी संपत्ती खरेदी केली असेल तर ती संपत्ती जप्त करण्यासाठी शासनाशी पत्रव्यवहार करणे, बॅंक खाती गोठविणे, आरोपींविरुद्ध तपास करून लवकरात लवकर त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे, हे तपास अधिकाऱ्यांचे काम आहे. मात्र आर्थिक गुन्हे शाखेकडून बहुतेक गुन्ह्यांचा तपास कासवगतीने केला जात असल्याचे दिसून येते. गतवर्षी २०२० मध्ये पोलिसांनी केवळ दोन गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. उर्वरित दहा प्रकरणांपैकी एक प्रकरण नोव्हेंबर २०२० मधील आहे. उर्वरित गुन्ह्यातील आरोपींना अटक करणे आणि तपास पूर्ण करून त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल होणे अपेक्षित होते, मात्र झाले नाही.

गतवर्षी गाजलेली प्रकरणे

- रिदास फायनान्स कंपनीच्या संचालकानी औरंगाबाद शहरातील गुंतवणूकदारांना अल्पावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे २ कोटी २२ लाखांचा गंडा घातला. आरोपींनी ना परतावा दिला ना मुद्दल परत केली. यामुळे सुमारे ७५ गुंतवणूकदारानी पोलिसांत धाव घेतली. गुन्हा नोंद झाल्यापासून आरोपी फरार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या आरोपींनी गंगापूर तालुक्यात खरेदी केलेली ६० एकर जमीन पोलिसांनी जप्त केली आहे.

========================

नासाचे कंत्राट मिळाल्याची थाप

गतवर्षी जानेवारीत नासाचे कंत्राट मिळाल्याची थाप मारून शहरातील आर्किटेक्टची अडीच कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपावरून नाशिक येथील अभिजित पानसरे, त्याची आई, बहीण आणि शहरातील ॲड. नितीन भवरविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. या केसमध्ये फरार असलेल्या भवरला अकरा महिन्यांनंतर पोलिसांनी अटक केली. या आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र अद्याप दाखल नाही.

======================

- रेल्वे आणि स्काउट-गाइडमध्ये नोकरीचे आमिष

रेल्वे आणि स्काउट-गाइडमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेक बेरोजगार तरुणांना ७० ते ८० लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. आरोपी सध्या जेलमध्ये आहे. त्याच्यावर लवकर दोषारोपपत्र दाखल होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

=======================

- वाळूज एमआयडीसीमधील कंपनीचा बनावट धनादेश बॅंकेत टाकून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारा कथित एनजीओचालक महिला सहा महिन्यांनुसारही पोलिसांना सापडली नाही. या महिलेला अद्याप अटक न झाल्यामुळे तिला हा बनावट धनादेश देणारा कोण? या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही.

=======================

कोट आहे (.डमीनुसार बातमी)