जालना : शहरातील काही भागात अनेक नागरिकांनी पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर अवैध नळ जोडण्या घेतल्या आहेत. यामुळे काही प्रभागात पाणीपुरवठा होण्यास अडचणी येतात. अवैध नळ जोडणीमुळे वादही होतात. अवैध नळ जोडणी अधिकृत करण्यासाठी पालिकेने मोहीम हाती घेतली आहे. जालना शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, नगर पालिकेचे उत्पन्न वाढावे आणि पाण्याची गळती थांबविण्यात यावी. आदी हेतू समोर ठेवून शहरातील अवैध नळ कनेक्शन नियमित करण्यासाठी सोमवार पासून ३१ आॅगस्टपर्यंत सर्व प्रभागामध्ये लोकप्रतिनिधी, तसेच नागरिकांच्या सहकार्याने विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहीमेचा शहरातील संबंधित नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक यांनी केले आहे.सोमवारी शहरातील चंदनझिरा प्रभागातून या मोहिमेची सुरूवात होणार असून, या मोहिमेचा लाभ घेऊन अवैध नळ कनेक्शन केले नाहीत तर संबंधीत नागरिकांविरूध्द कडक कारवाई करून फौजदारी दंडासह गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच अशा नागरिकांना भविष्यात कधीही नळ कनेक्शन देण्यात येणार नाहीत असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील अंबड, भोकरदन नगर पालिका क्षेत्रातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत नायक बोलत होते.या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीस उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जालना नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब मनोहरे, अंबड आणि भोकरदन नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)सोमवारपासून चंदनझिरा येथून मोहीम सुरू होणार सोमवारी शहरातील चंदनझिरा प्रभागातून या मोहिमेची सुरूवात होणार असून, या मोहिमेचा लाभ घेऊन अवैध नळ कनेक्शन केले नाहीत तर संबंधीत नागरिकांविरूध्द कडक कारवाई करून फौजदारी दंडासह गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.अवैध नळ जोडणी नियमित होणार असल्याने नागरिकांतूनही समधान व्यक्त होत आहे. नळ जोडणी वैध करण्यासाठी नगर पालिका किती रकम आकारणार हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
अवैध नळ कनेक्शन होणार आता नियमित
By admin | Updated: August 4, 2014 00:50 IST