शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

कुंडलिका नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:54 IST

कुंडलिका नदीपात्रास स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रशासनाने गाजावाजा करत खोलीकरण मोहीम हाती घेतली आहे, तर दुसरीकडे शहर हद्दीतून वाहणाºया याच नदीच्या पात्रातून राजरोसपणे अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातून वाहणाºया कुंडलिका नदीपात्रास स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रशासनाने गाजावाजा करत खोलीकरण मोहीम हाती घेतली आहे, तर दुसरीकडे शहर हद्दीतून वाहणाºया याच नदीच्या पात्रातून राजरोसपणे अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे. मात्र, प्रशासन यापासून अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.जिल्हा प्रशासनाकडून नदीपात्राचे खोलीकरण सुरू असताना लक्कडकोट भागाच्यावरील बाजूस कुंडलिका पात्रातून अवैध वाळू उपसा केला जात आहे. गर्द काटेरी झुडपांमुळे या भागात कोणी जात नसल्याचा फायदा वाळू चोरटे घेत आहेत. वाळूचा उपसा होत असल्याने नदीपात्रात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाळूची वाहतुक ट्रॅक्टरमधून केली जात आहे. वाळु चाळण्यासाठी वापरल्या जाणाºया चाळण्या, उपसा केल्यानंतर पडणारे खड्डे, चारचाकी वाहनांमुळे तयार झालेला रस्ता नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याची साक्ष देतो. अनेक दिवसांपासून नदीपात्रातून वाळू उपसा सुरू असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. रॉयल्टीच्या पावत्या नसताना दिवसाढवळ्या जालना- औरंगाबाद रस्त्यावर ट्रक्टरमधून वाळूची वाहतूकक केली जात आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास कुंडलिका नदीपात्राचे मुळ अस्तित्त्वच धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने अवैध वाळू उपसा करणाºयांवर तात्काळ कार्यवाही करणे गरजेचे आहे.दरम्यान, कुंडलिका नदी शहरातून सुमारे चार किलोमीटरपर्यंत वाहते. सीना नदीची लांबी मोठी आहे. गत काही वर्षांमध्ये नदीपात्रामध्ये अतिक्रमण वाढत आहे. शहरातील नदीपात्रालगत प्लास्टिक व इतर कचरा टाकल्याने नदीपात्र अस्वच्छ झाले आहे. नदीपात्र स्वच्छ करण्यासाठी कधी नव्हे ते प्रशासनाने कुंडलिका नदीच्या खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. मात्र, हे काम संथ गतीने सुरू आहे. सतरा दिवसांमध्ये अकरा पोकलेन मशीनच्या मदतीने लोखंडी पुल ते राजमहल टॉकीजपर्यंत खोलीकरण करण्यात आल. दरम्यान, खोलीकरणाचे काम सोमवारी बंद असल्याचे दिसून आले.