शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

जोगेश्वरीत अवैध प्लॉटिंग जोरात

By admin | Updated: May 9, 2014 00:05 IST

वाळूज महानगर : जोगेश्वरी ग्रामपंचायत हद्दीत भूमाफिया कृषिक जमिनीमध्ये रहिवासी व औद्योगिक वापरासाठी प्लॉट पाडून विकत आहेत.

वाळूज महानगर : जोगेश्वरी ग्रामपंचायत हद्दीत भूमाफिया कृषिक जमिनीमध्ये रहिवासी व औद्योगिक वापरासाठी प्लॉट पाडून विकत आहेत. या अवैध प्लॉटिंगची ग्रामपंचायतीच्या दप्तरात बेकायदेशीररीत्या नोंदही केली जात आहे. या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याची मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे गंगापूर-खुलताबाद विधानसभा अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर पा. नीळ यांनी जिल्हाधिकारी, जि.प. प्रशासन व तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या गटातील भूखंड माफियांशी आर्थिक व्यवहार करून त्यांना खोटे मूळ गावठाण प्रमाणपत्र तुपे यांनी दिले आहे. त्या आधारे भूखंडमाफिया रजिस्ट्री कार्यालयात जाऊन प्लॉट खरेदी करणार्‍यांना रजिस्ट्री करून प्लॉट विकत आहेत, असे पाटील यांचे म्हणणे आहे. काही जण भूखंडमाफियांकडून नोटरीच्या आधारे प्लॉट खरेदी करीत आहेत. या प्लॉटच्या नोंदी ग्रामपंचायतीच्या दप्तरी घेऊन त्यांना नमुना नंबर ८ चा उतारा देण्यात येत आहे. जिल्हाधिकार्‍यांनी नोटरीच्या आधारे प्लॉटच्या नोंदी घेऊ नयेत, असे आदेश ग्रामपंचायतीला दिले आहेत. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून प्लॉटच्या नोंदी ग्रामपंचायतीकडून घेतल्या जात आहेत. या विषयी ग्रामविकास अधिकारी प्रकाश तुपे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. उद्योजकांनाही विकतात भूखंड ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील जोगेश्वरी येथील गट नंबर १८१, १८२, १२, ९, ६१ व कमळापुरातील गट नंबर ६ व १५ मध्ये अवैध प्लॉटिंग झाली आहे. हे क्षेत्र सिडको अधिसूचित असताना सिडको प्रशासनाची परवानगी न घेता २० बाय ३० आकाराचे हे प्लॉट विकले जात आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी न घेता उद्योजकांना औद्योगिक वापरासाठी हे भूखंड विकले जात आहेत. या प्लॉटच्या नोंदी नियमबाह्यरीत्या ग्रामपंचायतच्या दप्तरी घेतल्या जात आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. ग्रामविकास अधिकारी प्रकाश तुपे हे या प्लॉटिंगच्या नोंदी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत न घेता परस्पर प्रोसिडिंग बुकला सदस्यांच्या स्वाक्षर्‍या घेऊन ले-आऊटला मंजुरी देऊन करीत आहेत.