औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात बसमध्ये पार्सलच्या स्फोटाच्या घटनेने हमालांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. परिणामी हमालांनी बसगाड्यांवर पार्सल ठेवण्याचे काम बंद केले आहे. त्यामुळे बसस्थानकातील पार्सलची वाहतूक सेवा ठप्प झाली.मध्यवर्ती बसस्थानकात मंगळवारी सकाळी ११.१५ वाजता उभ्या असलेल्या बसमध्ये पार्सलचा स्फोट झाला. त्यामध्ये हमाल आणि सहा प्रवासी जखमी झाले. या स्फोटाने बसस्थानकात एकच गोंधळ उडाला. पार्सलवर स्टेशनरी लिहून आतमध्ये केमिकलच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. त्याची माहिती हमालांना नव्हती. शिवाय पार्सलमध्ये काय आहे, याचा तपास करण्याची कोणतीही यंत्रणा नाही. अशा परिस्थितीमुळेच मंगळवारी पार्सल ठेवताना झालेल्या स्फोटात हमाल जखमी होण्याची घटना घडली. परिस्थिती पाहता घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे हमालांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. बसस्थानकात ७ ते ८ हमाल पार्सलची चढ-उतार करण्याचे काम करतात. या घटनेनंतर मंगळवारी दुपारपासून हमालांनी काम बंद केले. तर काही हमालांनी केवळ येणारे पार्सल उतरविण्याचे काम करण्यास प्राधान्य दिले. यापुढे प्रत्येक पार्सलसंदर्भात खबरदारी घेण्यावर भर दिला जाईल, असे पार्सल सेवेचे प्रतिनिधी मनोज राठी म्हणाले.हमालांना मार्गदर्शनया घटनेनंतर बुधवारी पार्सल विभागात काम करणाऱ्या हमालांना आगार व्यवस्थापक सी. के. सोळसे, वाहतूक निरीक्षक संतोष नजन, संघर्ष पगारे यांनी पार्सल ठेवताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले. औरंगाबाद : येथील मध्यवर्ती बसस्थानकात पाथर्डीकडे जाणाऱ्या बसमध्ये स्टेशनरी नावाच्या पार्सलमधील अॅसिड बाटल्यांच्या स्फोटात मंगळवारी हमालांसह सात प्रवासी जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने बुधवारी २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.राजन झांबड (रा. पदमपुरा), अमोल सोनवणे ( रा. क्रांतीनगर) आणि संतोष मुळे ( रा. प्रगती कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत. यविषयी अधिक माहिती देताना क्रांतीचौक ठाण्याचे निरीक्षक नागनाथ कोडे म्हणाले की, एस. टी. बस (क्र. एमएच-०७ सी. ७३४२) ही पाथर्डी येथून औरंगाबाद बसस्थानकावर मंगळवारी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास पोहोचली होती. त्यानंतर ११ वाजता बस पाथर्डीला जाण्यासाठी उभी होती. त्यावेळी वाहक शैलेंद्र पोटे हे बसच्या गेटमध्ये उभे होते. हमाल शेख सफियोद्दीन शेख यांनी दोन पार्सल आणले. शालेय साहित्य असे या पार्सलवर लिहिले होते. पहिले पार्सल ठेवल्यानंतर हमालाने दुसरे पार्सल पहिल्या पार्सलवर बसच्या गेटमधून फेकले. दुसरे पार्सल पहिल्यावर आदळताच त्यातील केमिकलच्या बाटल्या फुटल्या आणि मोठा स्फोट झाला. शालेय साहित्य असे नमूद केलेले पार्सल हे राजन झांबड यांचे असल्याचे समोर आले. दोन्ही बॉक्स झांबडकडे काम करणाऱ्या अमोल सोनवणे याने अंकल पॅकर्स अॅण्ड फॉरवर्डस प्रा. लिमिटेडचा मालक संतोष मुळे यांच्याकडे पाथर्र्डी येथे नेण्यासाठी बुकिंग केली होती. या आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून रात्री अटक केली. न्यायालयाने आरोपींना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मध्यवर्ती बसस्थानकातील पार्सल सेवा अखेर ठप्प
By admin | Updated: June 23, 2016 01:28 IST