शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

भोलानाथऐवजी कोविडनाथनेच दिली वर्षभराची सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:05 IST

पुढील संकटापासून अनभिज्ञ असणाऱ्या निरागस बालकांनी सुटी जाहीर होताच आनंदोत्सव साजरा केला. पण, आता मात्र ही वर्षभरापासून मिळालेली सक्तीची ...

पुढील संकटापासून अनभिज्ञ असणाऱ्या निरागस बालकांनी सुटी जाहीर होताच आनंदोत्सव साजरा केला. पण, आता मात्र ही वर्षभरापासून मिळालेली सक्तीची सुटी ‘बोअर’ झाली असल्याचे बालकांनी सांगितले.

चौकट :

मुले सुरक्षित राहिली, हेच यश

ऑनलाइन शिक्षण मिळालेले आणि न मिळालेले असे विद्यार्थ्यांचे सरळ दोन गट पडले आहेत. ऑनलाइन शिक्षण फक्त ५०-५५ टक्के विद्यार्थ्यांपर्यंतच पोहोचले आहे, असा शिक्षण विभागाचा सर्व्हे आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा न मिळू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या मुलांचे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम, डोळ्यांचा त्रास, चिडचिडेपणा या आजारांच्या रूपात मानसिक आणि शारीरिक नुकसान झाले आहे. मुलांचा दिनक्रम पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. कलेचा कुंचला ऑनलाइन माध्यमातून घेऊन गुरुजी कला आणि व्यक्तिमत्त्त्व विकास घडवू शकत नाहीत. त्यासाठी शिक्षकांचा प्रत्यक्ष सहवासच आवश्यक असतो. यावर्षी सगळेच विद्यार्थी यापासून वंचित राहिले. तरीही महामारीच्या काळात मुले सुरक्षित राहिली, हेच यावर्षीचे मोठे यश आहे.

- एस. पी. जवळकर.

शिक्षणतज्ज्ञ

चौकट :

पालकांना वाटतेय भीती

वर्षभराची सुटी संपून मुले जेव्हा शाळेत जातील, तेव्हा एकाग्रता, लिहिण्याचा सराव, शाळेत ६-७ तास एकाच जागी बसण्याची सवय, शाळेची शिस्त, अभ्यासाची सवय मुलांना राहिलेली नसेल. या सर्व गोष्टींची सवय करून अभ्यासात पुन्हा मन रमविणे, ही मुलांसाठी अतिशय अवघड गोष्ट ठरणार आहे, अशी भीती काही पालक व्यक्त करत आहेत. वर्षभराच्या सुटीमुळे आपली मुले ‘होमसिक’ झाली आहेत, असे मतही काही पालकांनी व्यक्त केले.