लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गुरुवारपासून जिल्ह्यात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. घरोघरी घटस्थापना करुन सार्वजनिक ठिकाणी दुर्गा देवींची प्रतिष्ठापना करण्यात आली.९ दिवस हा उत्सव साजरा केला जात आहे. गुरुवारी सकाळपासूनच दुर्गा देवींची शहरातून सवाद्य मिरवणूक काढत प्रतिष्ठापना करण्यात आली. घरोघरी घटस्थापना करुन नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात दुर्गा देवींच्या मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परभणी शहरात विविध सार्वजनिक दुर्गा मंडळांनी दुर्गा देवींची प्रतिष्ठापना केली आहे. मंडळांनी आकर्षक देखावेही उभारले आहेत. विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाने या उत्सवाची सांगता होणार आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}