शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गुंठेवारीची महालेखा परीक्षकांकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2017 00:31 IST

औरंगाबाद : अनधिकृत वसाहती अधिकृत करण्यासाठी राज्य शासनाने २००० मध्ये गुंठेवारी कायदा अस्तित्वात आणला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अनधिकृत वसाहती अधिकृत करण्यासाठी राज्य शासनाने २००० मध्ये गुंठेवारी कायदा अस्तित्वात आणला. या कायद्याचा आधार घेऊन महापालिकेने तब्बल १७ हजारांहून अधिक मालमत्ता अधिकृत केल्या. हजारो खुल्या जागांना गुंठेवारी कायद्यानुसार बांधकाम परवानगी देण्यात आली. या संपूर्ण कारभाराची कसून चौकशी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी नागपूरच्या महालेखाकार कार्यालयातील सहा अधिकारी व कर्मचारी सध्या मनपात दाखल झाले आहेत. मागील काही वर्षांमध्ये औरंगाबाद शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वसाहती निर्माण झाल्या. या वसाहतींना मूलभूत सोयी- सुविधा देण्याचे दायित्व महापालिकेवर येऊन ठेपले. ५० पेक्षा अधिक वसाहती २००० मध्ये तयार झाल्या होत्या. याचदरम्यान, शासनाने गुंठेवारी कायदा अंमलात आणला. गुंठेवारी शुल्क भरून नागरिकांनी आपल्या मालमत्ता नियमित करून घ्याव्यात हा त्यामागचा उद्देश होता. औरंगाबाद शहरात या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. ६० हजार मालमत्तांपैकी फक्त १७ हजार मालमत्ताच नियमित करण्यात आल्या. मागील १७ वर्षांमध्ये मनपाला गुंठेवारीची शंभर टक्के अंमलबजावणी न करता आल्याने गुंठेवारीतील मालमत्ता नियमित करून देण्याचे काम थांबविण्यात आले. राजकीय मंडळींनी परत प्रशासनावर दबाव टाकून आणखी तीन महिने या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, गुंठेवारीतील कारभाराची आजपर्यंत कोणतीच चौकशी करण्यात आली नाही. राज्य शासनाने औरंगाबाद शहरातील गुंठेवारीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी नागपूर येथील महालेखा परीक्षक कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांचे एक पथक औरंगाबादेत पाठविले आहे. वॉर्ड कार्यालयांतर्गत गुंठेवारीत नियमित करण्यात आलेल्या कामांची पथक तपासणी करणार आहे. मागील दोन दिवसांपासून या पथकाने कामही सुरू केले आहे. या लेखा परीक्षणाचा अहवालही शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.वसाहतींची पाहणी करणारनागपूरहून आलेले पथक वॉर्ड कार्यालयात गुंठेवारीच्या कामाची बारकाईने पाहणी करीत आहे. मनपाने कोणत्या वसाहती नियमित केल्या, त्या वसाहतींचीही पाहणी पथक करणार आहे.